नवी मुंबई : वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना अटक,फरार आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक

Navi Mumbai Busted Sex Racket : हॉटेल सत्यम नेरूळ नवी मुंबई येथे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या वेटर मॅनेजर आणि मुलीपुरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले अटक
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने 14 मार्चच्या दरम्यान हॉटेल सत्यम हॉस्पॅलिटी सेक्टर-1, शिरवणे, नेरूळ नवी मुंबई येथे छापेमारी करून पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या आणि हॉटेलच्या वेटर आणि ग्राहकांसोबत महिलांना लॉजवर पाठवणाऱ्या अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. Navi Mumbai Busted Sex Racket यादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police Rescued 5 Girl पाच पीडित महिलांची यातून सुटका केली असून या कारवाईदरम्यान मुख्य सूत्रधार असलेला आरोपी साहिल उर्फ शाहीन सुराजुल मंडल (38 वय) हा कारवाईदरम्यान नेरूळ पोलीस ठाण्यातून Nerul Police Station पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आरोपीला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भाबंरे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी नवी मुंबई परिसरात चालणाऱ्या अवैध आणि अनैतिक व्यापाराबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी 14 मार्च च्या दरम्यान सत्यम हॉस्पिटॅलिटी सेक्टर-1 शिरवणे नेरूळ येथे कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. साहिल उर्फ शाहिन शिराजुल मंडल (38 वय रा. सेक्टर 20 नेरूळ नवी मुंबई, मुळ रा. पश्चिम बंगाल), वेटर अरविंद कुमार देवलाल यादव (27 वय रा. लॉज स्टाफ मुळ रा. बिहार) आणि लॉजवर पाठवणारा शंभू मुनीलाल उपाध्याय यांना अटक केली होती. त्यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दरम्यान आरोपी साहिल उर्फ शाहीन सुराजुल मंडल हात येथून पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीचे गोपनीय व तांत्रिक माहिती द्वारे आरोपी हा मूळ गावी गेला असल्याबाबत खात्रीदायक माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. आरोपी साहिल याला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपीला नेरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. Navi Mumbai Police Latest News
सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे , AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, पाटील, पोलीस हवालदार धोनसेकर, अडकमोल, पोलीस शिपाई हांडे हे सहभागी होते. Navi Mumbai Police Latest News