क्राईम न्यूज

Navi Mumbai SPA Center : स्पा सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय! वाशीतील ‘अलमो स्पा’वर गुन्हे शाखेचा धाडसी छापा

Navi Mumbai Police Busted Spa Racket : 7 हजारात शरीरविक्रयाचा सौदा; पोलिसांनी मोडला अनैतिक धंद्याचा बालेकिल्ला,सहा पीडित महिलांची सुटका, मालक व व्यवस्थापक अटकेत

नवी मुंबई :- नवी मुंबईतील वाशी सेक्टर 19 डी येथील उच्चभ्रू साजेश्या अलमो स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा घृणास्पद प्रकार अखेर उघडकीस आला आहे. Navi Mumbai Spa Sex Racket गुन्हे शाखेच्या पथकाने 17 मे रोजी बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकून सहा पिडित महिलांची सुटका केली, तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे, व उपायुक्त अमित काळे यांच्या आदेशांनुसार, नवी मुंबईत अनैतिक व्यापारविरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवण्यात आले. ग्राहकाने संकेत दिल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली असता, अलमो स्पामध्ये महिलांकडून जबरदस्तीने शरीरविक्रय करवून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

स्पाचा मालक अभिजीत नायडु याने बनावट ग्राहकास मुली दाखवून 7000 रुपये घेतले, तर व्यवस्थापिका प्रणाली गवसकर हिने त्याची सही करून नोंद केली. यावेळी मॅनेजर संजय उर्फ रेहमत इलाही शेख देखील उपस्थित होता. या तिघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, बीएनएस कलम 3(5) व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.तीनही आरोपींना अटक करून 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, अमित काळे गुन्हे शाखा, नवी मुंबई व सहाय्यक पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख,अलका पाटील, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, म्हात्रे, अडकमोल, धोनसेकर, हांडे हे सहभागी होते.

vivek

Recent Posts