क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन ऑनलाईन फसवणुक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा सायबर सेल पनवेल केला पर्दाफाश ; 8 जण ताब्यात

पनवेल : शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन Navi Mumbai Share Market Fraud ऑनलाईन फसवणुक करणार्‍या Online Fraud आंतरराज्य टोळीचा सायबर सेल पनवेलने पर्दाफाश केला असून आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

दिनांक 18/03/2024 ते दिनांक 17/04/2024 या कालावधीत फिर्यादी यांना अनोळखी आरोपींनी मोबाईल फोनवर संपर्क करून एफ.एम ट्रेडर्स कंपनीमधील एक्झीक्युटीव्ह, अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवुन फिर्यादी यांना एफ एम ट्रेडर्स कंपनीच्या पीएमएस इकविटी कॅपिटल अँपमध्ये फिर्यादींच्या नावाचे डिमॅट खाते ओपन करून, फिर्यादी यांना ट्रेडिग करीता विविध स्कीम सांगुन, फिर्यादींचा विश्‍वास संपादीत करीत त्यांना मोठा नफा करून देण्याचे आमिष दाखविले व फिर्यादी यांना एकुण रू. 21,71,721 /- रू. वेगवेगळया बॅक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सांगुन फिर्यादी यांनी गुंतवणुक केलेली रक्कम फिर्यादी यांस परत न करता फसवणुक केली म्हणुन कामोठे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑनलाईन शेअर मार्केट फ्रॉड गुर्‍हयांमध्ये वाढ होत असल्याने सदर गुन्हयाची उकल करून आरोपीतांना जेरबंद करण्याच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परि. 2 पनवेलचे विवेक पानसरे यांचे आदेशाने सदरचा गुन्हा ईएमसी सायबर सेल, पनवेल यांचेकडे पुढील तपासाकरीता देण्यात आला. सायबर सेल, पनवेलच्या पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व पथक यांनी सदर गुन्हयातील बॅक व्यवहार आणि क्लिष्ट तांत्रिक विश्‍लेषण केले असता सदर गुन्हयातील संशयित आरोपी हे बंगलोर, कर्नाटक राज्य व इंदोर, मध्यप्रदेश याठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी एकाच वेळी कारवाई होणे आवश्यक असल्याने सायबर सेल, पनवेलच्या पो.नि. दिपाली पाटील यांनी बंगलोर, कर्नाटक राज्य व इंदोर मध्यप्रदेश याठिकाणी वेगवेगळी पथके पाठवुन सापळा रचुन एकुण 08 आरोपींना शिताफीने अटक केली. तसेच ज्या कॉल सेंटरमधुन सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंजमधील ’अपोलो टॉवर्स मध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरीता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. सदर कारवाईतील 14 संशयित इसमांकडे सखोल तपास चालु आहे. तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनविणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालविणारे आरोपीत यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकुण 25 बनावट वेबसाईट बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाई दरम्यान एकुण 60 मोबाईल, 4 लॅपटॉप, 20 सिमकार्डस, बॅक अकाउंट डाटा, मोबाईल ईमेल डाटा, चेकबुक्स, डेबिटकार्डस, फसवणुक केलेल्या/करावयाच्या बाबींच्या नोंदी असलेल्या वहया इ. मिळुन आल्या आहेत. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कॉल सेंटरमध्ये एकुण 08 मुली व 05 मुले काम करीत असुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. सदर टोळीने केलेल्या फसवणुकीचे पश्‍चिम मध्य क्राइम पोलीस ठाणे, दक्षिण मध्य क्राईम पोलीस ठाणे बंगलोर शहर (कर्नाटक राज्य), सायबराबाद (तेलंगणा राज्य), टी. नगर ( तामीळनाडु राज्य ), जयपुर (राजस्थान राज्य), नवी मुंबई, पुणे (महाराष्ट्र राज्य) येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. सदर टोळीतील आरोपीतांनी भारतात विविध राज्यातील लोकांना फसविले असल्याची शक्यता आहे. वर नमुद जप्त मुद्देमालाचा अधिक तपास करण्याचे काम चालु आहे.  सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान सायबर सेल, पनवेल यांनी फिर्यादी यांच्या फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँकांची खाती गोठविण्याबाबत बँकांना तात्काळ पत्रव्यवहार करून एकुण रू. 6,07,856/- इतकी रक्कम गोठविण्यात यश मिळविले आहे. Navi Mumbai Share Market Fraud News

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2 पनवेल, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल अशोक राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली ईएमसी सायबर सेलचे पोनि दिपाली पाटील, कामोठे वपोनि अजय कांबळे, मसपोनि वृषाली पवार, सपोनि समीर चासकर, पो.उपनि. संदेश कोठावळे, पो.हवा. वैभव शिंदे, तुषार चोधरी, मपो.हवा. प्रगती म्हात्रे, पो.ना. दादासाहेब माने, पो.शि. संतोष चौधरी, संभेरवार यांनी उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास ईएमसी सायवर सेल, पनवेल पोलीस निरिक्षक दिपाली पाटील करीत आहेत. Navi Mumbai Share Market Fraud News

टेलिग्राम, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाज माध्यमांवरून ओळख करून जर कोणी शेअर मार्केट गुंतवणुक/इतर ऑनलाईन कामाचे प्लॅन सांगुन वेगवेगळया अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल तर त्याबाबत सतर्क रहावे. ऑनलाईन फसवणुकीची तकार टोल फी क. 1930 किंवा cybercrime.gov.in येथे त्वरीत करावी. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे Navi Mumbai Share Market Fraud News

Web Title : Navi Mumbai Share Market Fraud: Panvel busts cyber cell of inter-state gang that lured good returns in share market online; 8 people detained

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0