मुंबई

Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; बांगलादेशी तरुणीची सुटका.!

Navi Mumbai Sex Racket Busted By Police : नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांची मोठी कारवाई ; तळोजा परिसरात बांगलादेशी महिले कडून चालविणाऱ्या वेश्याव्यवसायचा केला पर्दाफाश

नवी मुंबई :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी धडक कारवाई करत नवी मुंबईच्या तळोजा परिसरात चालविणारा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. Navi Mumbai Sex Racket याप्रकरणी पोलिसांनी एका बांगलादेशी महिला (दलाला) एजंटला Bangladeshi Agent अटक केली असून एका बांगलादेशी पीडित तरुणीची सुटका केली आहे. Navi Mumbai Latest Crime News

तळोजा फेज-2, साई आनंद बिल्डिंग, एका रूममध्ये सेक्स व्यवसाय चालू असल्याची खात्रीदायक माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. सेक्टर 17 अली अपार्टमेंट बाजूला असणाऱ्या बिल्डिंग मधील ग्राहकाला सेक्सकरिता मुली दाखवण्याकरिता दोन हजार रुपये स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Navi Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी घटनेबाबत शहानिशा करून बोगस ग्राहका मार्फत घटनास्थळी पाठविले. तसेच एका महिलेला वेश्या काम करण्याकरिता ठेवल्याचे त्याच्या पाहण्यात आले. पोलिसांनी या बोगस ग्राहकांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एजंट महिला (दलाल) हसीना मुशरफ खान (30 वय रा. बांगलादेश) हिला वेश्याव्यवसायाच्या कामाकरिता बोगस ग्राहकाकडून हजार रुपये तिचे साथीदार सालिया शपिक खान (39 वय रा. तळोजा) तिच्या क्यूआर कोड वर पाठवण्यास सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. Navi Mumbai Latest Crime News

एका महिलेला सेक्स रॅकेट चालवण्याबाबत अटक केली असून तर दुसऱ्या महिलेला अवैधरीत्या भारतात राहत असल्याच्या कारणावरून अटक केली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात Taloja police Station महिलेंच्या विरोधात बीएनएस कलम 143 (2), 3 (5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3,4,5, भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी नागरीक अधिनियम कलम 14 (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे. दोन्ही महिला आरोपी यांना गुन्हयात 20 रोजी सकाळी अटक करण्यात आली असुन त्यांना 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे. पिडीत बांगलादेशी तरुणीला सुरक्षेकरीता चेंबुर येथे नवजीवन सुधारगृहात, ठेवण्यात आले आहे.

पोलीस पथक

अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस शिपाई चव्हाण, पारासुर, कोलते, पाटील, अडकमोल, पोलीस हवालदार हांडे हे सहभागी होते. Navi Mumbai Latest Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago