Navi Mumbai Sex Racket Busted : नवी मुंबई उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालायचा वेश्याव्यवसाय ; एजंट महिलेला अटक, पीडित तरुणीची सुटका
•Prostitution in Navi Mumbai Elite Society पैशांच्या मोबदल्यात ग्राहकांच्या मागणीनुसार स्नेहालया अपार्टमेंटमध्ये तरुणींचा पुरवठा होत होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नवी मुंबई :- सीबीडी बेलापूर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये देहविक्री सुरू असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. Sex Racket Busted यावेळी पोलिसांनी कारवाई करत एजंट महिलेला अटक केली असून पीडित तरुणीची सुटका केली आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर-1 ओ येथे स्नेहलया अपार्टमेंटमधील एका घरात देहविक्री सुरू आहे. Sex Racket Busted अशी माहिती मुंबई स्मालईल्स एनजीओ यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना दिली होती.कनकम्मा नावाची महिला हा व्यवसाय करत असल्याच्या पोलिसांना माहिती मिळाली होती. आर्थिक मोबदल्यात ग्राहकांना वेश्या व्यवसाय करिता तरुणी पाठवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहानिशा करून बनावट ग्राहकांच्या माध्यमातून एजंट महिला कनकम्मा हिला अटक केली आहे. बोगस गिऱ्हाईकाने कनकम्मा तिच्याशी संपर्क साधून सेक्स काम करिता तरुणींची मागणी केली होती. व्हाट्सअप वर तरुणी आणि महिलांचे फोटो पाठव ग्राहकांच्या आवडीनुसार महिला पुरवली जात होते.Sex Racket Busted अडीच हजार रुपये घेऊन ती कामाच्या मोबदल्यात पीडित तरुणीला काही पैसे देत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाणे येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयात वापरण्यात आलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास हा सीबीडी पोलीस ठाणे करत आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई व सहा. पोलीस आयुक्त AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, महिला पोलीस हवालदार धोनसेकर, महिला पोलीस हवालदार अडकमोल, महिला पोलीस नाईक, भोये हे सहभागी होते