क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Scam : अमित महादेव खारकरचा बेकायदेशीर माती-मुरूम टाकण्याचा पर्दाफाश

नवी मुंबईत माती मुरूम घोटाळा!

नवी मुंबई जितिन शेट्टी :- नवी मुंबईजवळील गव्हाण -जासाई रस्त्यावर बेकायदेशीर माती-मुरूम Navi Mumbai Mati Muram Scam आणि डेब्रिस टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारात प्रमुख सूत्रधार म्हणून अमित महादेव खारकर Amit Kharkar यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एमटीएचएल लेबर कॅम्पजवळील खुल्या जागेवर ही अवैध डेब्रिस/माती/मुरूम सामग्री टाकली जात आहे. ही सामग्री टाकण्यासाठी येणाऱ्या डंपर आणि ट्रक प्रामुख्याने MH47 क्रमांकाचे असल्याचे समोर आले आहे.

पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते अरमान संजय पवार यांनी या प्रकरणाविरोधात वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांनी संबंधित बेकायदेशीर कृत्याबाबत दक्षता विभाग सिडको, एसीपी पोर्ट विभाग नवी मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका झोन 1 आणि एमपीसीबी रायगड या सर्व शासकीय यंत्रणांना माहिती दिली आहे.

अरमान पवार यांचे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणावर एमटीएचएल अटल सेतू वरून ट्रक आणि डंपर उलवे मार्गे गव्हाण -जासाई रस्त्यावर एमटीएचएल लेबर कैंप जवळ माती, मुरूम आणि डेब्रिस टाकले जात आहे. हे कृत्य बेकायदेशीर असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

या प्रकरणात केवळ अमित महादेव खारकरच नाही, तर अनेक सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील व्यक्तींवरही गंभीर आरोप होत आहेत. बेकायदेशीर टाकाऊ साहित्य टाकण्यासाठी सरकारी यंत्रणांनी डोळेझाक केली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अरमान पवार यांनी प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर कडाडून टीका केली आहे.

या बेकायदेशीर कृत्यामुळे गव्हाण -जासाई रस्त्यावरील पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणावर डेब्रिस/माती/मुरूम टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे आणि स्थानिक परिसराची नैसर्गिक रचना उद्ध्वस्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत जवाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या बेकायदेशीर प्रकरणात कोणते अधिकारी सहभागी आहेत? त्यांचे संगनमत कसे चालले आहे? आणि पर्यावरणीय विध्वंसाला कोण जबाबदार आहे? लवकर द्यायची माहिती आपल्यासमोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0