Bhiwandi Robbery News
Navi Mumbai Police Arrested Mobile Robbers : नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई ; मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद
नवी मुंबई :- एपीएमसी परिसरातील Navi Mumbai MPSC Market जनता मार्केट येथील मोबाईल दुकानात Mobile Robbery चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीमध्ये चोरलेले तब्बल पेटी पॅक 101 मोबाईल पोलिसांनी Navi Mumbai Police आरोपींकडून जप्त केले आहे. तसेच लाखोचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आरोपीकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलिसांकडून आरोपीचा छडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी रात्रीच्या वेळेस एफएमसी परिसरातील जनता मार्केट मध्ये असलेल्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून दुकानातील मोबाईल फोन व इतर साहित्य जवळपास 17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्या बाबतची तक्रार एपीएमसी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेनंतर सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अजय कुमार लांडगे यांनी घटनास्थळी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाला भेट देऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपींना शोध घेण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे शाखेचे दोन पथक समांतर तपास सुरू केला होता. एपीएमसी, वाशी आणि इतर परिसरातील सतत 6 दिवस निगराणी व तांत्रिक तपास केल्यानंतर तीन अनोळखी व्यक्तीची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाने पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना तुर्भे गावा परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्व चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तसेच या तीन आरोपींपैकी एका आरोपीवर नवी मुंबईच्या तब्बल 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपीकडून पेटी पॅक 101 मोबाईल फोन, 26 स्मार्ट वॉच, 10 एअर बड इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण 17 लाख 19 हजार 606 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. Navi Mumbai Police Latest News
गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे
आरोपी सेल्वराज मणि नाडर याच्यावर नवी मुंबईच्या 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.अनिकेत समशेर यादव याच्यावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारांबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजयकुमार लांडगे, यांचे मार्गदर्शनाखाल मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार संजय राणे, पोलीस नाईक सचिन टिके, महेश अहिरे,निलेश किंद्रे,सतिश चव्हाण, नवी मुंबई यांनी केली आहे. Navi Mumbai Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…