क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Robbery News : मोबाईल दुकानात चोरी प्रकरणी तिघांना अटक ; तब्बल 101 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Police Arrested Mobile Robbers : नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई ; मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद

नवी मुंबई :- एपीएमसी परिसरातील Navi Mumbai MPSC Market जनता मार्केट येथील मोबाईल दुकानात Mobile Robbery चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीमध्ये चोरलेले तब्बल पेटी पॅक 101 मोबाईल पोलिसांनी Navi Mumbai Police आरोपींकडून जप्त केले आहे. तसेच लाखोचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आरोपीकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News

पोलिसांकडून आरोपीचा छडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी रात्रीच्या वेळेस एफएमसी परिसरातील जनता मार्केट मध्ये असलेल्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून दुकानातील मोबाईल फोन व इतर साहित्य जवळपास 17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्या बाबतची तक्रार एपीएमसी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(4),305,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेनंतर सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अजय कुमार लांडगे यांनी घटनास्थळी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकाला भेट देऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपींना शोध घेण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे शाखेचे दोन पथक समांतर तपास सुरू केला होता. एपीएमसी, वाशी आणि इतर परिसरातील सतत 6 दिवस निगराणी व तांत्रिक तपास केल्यानंतर तीन अनोळखी व्यक्तीची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाने पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना तुर्भे गावा परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्व चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तसेच या तीन आरोपींपैकी एका आरोपीवर नवी मुंबईच्या तब्बल 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपीकडून पेटी पॅक 101 मोबाईल फोन, 26 स्मार्ट वॉच, 10 एअर बड इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण 17 लाख 19 हजार 606 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. Navi Mumbai Police Latest News

गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे

  • 1) सेल्वराज मणि नाडर (55 वर्ष) मजुरी रा. एपीएमसी मार्के परीसर, नवी मुंबई
  • 2) नरेश कुमार मुन्नीलाल वर्मा (27 वर्ष) धंदा- हमाली रा. एपीएमसी मार्केट परीसर, नवी मुंबई
  • 3) अनिकेत समशेर यादव (19 वर्ष) धंदा-चालक, रा. धनराज बारचे वर, तुर्भे गाव, नवी मुंबई.

आरोपी सेल्वराज मणि नाडर याच्यावर नवी मुंबईच्या 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.अनिकेत समशेर यादव याच्यावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारांबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजयकुमार लांडगे, यांचे मार्गदर्शनाखाल मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार संजय राणे, पोलीस नाईक सचिन टिके, महेश अहिरे,निलेश किंद्रे,सतिश चव्हाण, नवी मुंबई यांनी केली आहे. Navi Mumbai Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0