क्राईम न्यूजमुंबई

Navi Mumbai Robbery News : नवी मुंबईतील ऐरोली आणि वाशी येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक

Navi Mumbai Crime Branch Arrested Robbers : गुन्हेगारांचा कसून शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस करत आहेत. याच दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी आलेखावरील आरोपी आसिफ जहीर शेख, यास सापळा रचून पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने 7 गुन्हे उघडकीस आले आहे.

नवी मुंबई :– नवी मुंबईतील ऐरोली आणि वाशी येथे घरफोडी, चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Navi Mumbai Robbery News आसिफ जहीर शेख, (वय 41,रा. खान कंपाउंन्ड कौसा मुंब्रा ठाणे, मुळगाव : कलबुर्गी कनार्टक )असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून अर्धा किलो सोनं आणि 3.2 किलो चांदीचे दागिने, 16 लाख रुपये रोख रक्कम, तीन लॅपटॉप, आयफोन, दोन चोरीच्या मोटरसायकल असा एकूण 60 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी Navi Mumbai Police जप्त केला आहे.

ऐरोली व वाशी परिसरात नोव्हेंबर व डिसेंबर 2024 महिण्यात रात्री घरफोडी करून धुमाकुळ घालणा-या सराईत गुन्हेगाराचा शोध मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी व अंमलदार समांतर तपास करून घेत होते. परंतु गुन्हेगार हा घरफोडीचे गुन्हे करताना हेल्मेट परिधान करून, चोरीच्या मोटरसायकलवर बनावट नंबरप्लेट वापरत असल्याने सिसिटिव्हि फुटेज व तांत्रिक तपास करून अनोळखी आरोपीस पकडण्यास अडचणी येत असल्याने यश प्राप्त होत नव्हते.मिलींद भांरबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घरफोडी चोरी या गुन्हयांना प्रतिबंध करणे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याच्या वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत.

7 डिसेंबर 2024 रोजी ऐरोली येथे भरवस्तीमध्ये रात्रीच्या दरम्यान घरफोडी झाल्याने रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) अन्वये दाखल होताच अजयकुमार लांडगे सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचेसह मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवुन त्याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांनी गुन्हेगारास पकडण्याकरीता मार्गदर्शनपर सुचना दिल्या.त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी दोन तपास पथके तयार करून सतत अहोरात्र 15 दिवस गुन्हेगारास पकडण्याकरीता घटनास्थळी तांत्रिक तपास करून मुंब्रा परिसरातील आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पाच गृहनिर्माण सोसायटीमधील राहत असलेल्या सर्व रहिवाश्यांकडे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी निष्पण्ण करून गुलबर्गा, कर्नाटक राज्यात असल्याने तात्काळ कर्नाटक राज्यात पथक पाठवुन त्यास शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेवुन गुन्हयात 29 डिसेंबर 2024 रोजी अटक करून त्याची 09 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळवुन त्याचेकडुन घरफोडी चोरीचे 05 व मोटार सायकल चोरीचे 02 असे एकुण 07 गुन्हे उघडकीस आणुन कर्नाटक राज्यातुन एकुण 60 लाख किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस पथक
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव (तपास अधिकारी ), सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, अनिल यादव, संजय राणे,महेश पाटील, पोलीस नाईक सचिन टिके, निलेश किंद्रे, अजय कदम,सतिश चव्हाण, नितिन परोडवाड, महिला पोलीस शिपाई पुजा वैदय यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0