नवी मुंबई : वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा; लॉजचालक अटकेत अन् तीन पिडीत तरुणींची सुटका

Navi Mumbai Police Busted Illegal Sex Racket : नवी मुंबईच्या वाशी परिसरातील हॉटेल न्यू सेव्हन स्टार, लॉजिंग अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांचे छापेमारी, वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, चार आरोपींना अटक
नवी मुंबई :- नवी मुंबई, वाशीच्या एपीएमसी सेक्टर 19 या परिसरातील हॉटेल न्यू 7 स्टार लॉजवर Navi Mumbai Sex Rqcket चालणार्या वेश्या व्यवसायादरम्यान डमी ग्राहक पाठवून पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून बन्टी साव (लॉज मॅनेजर) याच्यासह तिघांच्या विरोधात एफएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा FMC Navi Mumbai Police Station दाखल करण्यात आला असून, आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेश्याव्यवसायातील पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी परिसरात हॉटेल न्यू सेव्हन स्टार येथील मॅनेजर हा लॉज मध्ये ग्राहकांना वेश्या व्यवसायासाठी ओली व महिला पूरवित असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने लॉजवर बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेवून त्याची पोलखोल केली. यावेळी ग्राहकाला 5000 रुपये मागण्यात आले. ग्राहकाकडून पाच हजार रुपये स्वीकारताना हॉटेलचा कुक कुमार गौडा याला तब्येत घेण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तारापद दास (वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवणारा), विक्की, बन्टी साव (लॉज मॅनेजर), कुमार गौडा (कुक) यांना अटक केली असून यांना न्यायालयासमोर हजर केले असता 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

पोलीस पथक
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, AHTIJ, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, पाटील, पोलीस हवालदार धोणसेकर, अडकमोल, हांडे हे सहभागी होते.