मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘राजकीय वादळ’! – निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा निष्ठावान शिलेदार ‘शिंदे गटात’ सामील

Navi Mumbai Shinde Shivsena News : पाच नगरसेवकांनी दिला ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का; कडवे नेते मनोहर मढवी (एम.के) यांची नऊ वर्षांची निष्ठा संपुष्टात; शिंदे गटाची ताकद वाढली

नवी मुंबई :- महापालिका निवडणुकीची घोषणा होताच नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ‘भू-स्फोट’ झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख आणि निष्ठावान नेते मनोहर मढवी (एम. के) यांच्यासह ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचे दोन, अशा एकूण पाच नगरसेवकांनी काल, मंगळवारी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे.

ऐरोलीच्या ‘एम.के.’ यांची साथ सुटली

ऐरोली भागातून सलग चार वेळा निवडून आलेले मनोहर मढवी (एम. के) हे या प्रवेशाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना तडीपारही करण्यात आले, तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. खासदार राजन विचारे यांचे निकटवर्तीय असलेल्या मढवी यांनीही आता शिंदे गटात प्रवेश केल्याने, ठाकरे गटाच्या नेतृत्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कुठे आणि कसे झाले प्रवेश?

ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

प्रवेश करणारे नगरसेवक

ठाकरे गट: मनोहर मढवी (एम.के), विनया मढवी, करण मढवी.

काँग्रेस: पूनम पाटील, अमित पाटील.

या प्रवेशामुळे नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला शिंदेची शिवसेना विरुद्ध वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार आहे. महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांना या प्रवेशामुळे नवे वळण मिळाले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago