Navi Mumbai Police’s Cyber Department Nabs Accused in Stock Market Scam
ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा, आर्थिक आमिषाला बळी
•नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून दोन आरोपींना अटक, कोट्यावधीची फसवणूक
नवी मुंबई :- शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. आर्थिक आमिषाला बळी पडणाऱ्या एका फिर्यादीची जवळपास कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याची घटना नवी मुंबईच्या सायबर विभागाने उघड केली आहे. सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपींना तुर्भे येथील सारस्वत बँकेच्या परिसरातून अटक केली आहे.
शेअर मार्केटमध्ये कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहे फिर्यादी याला जास्त नफा मिळण्याचे आमिष दाखवून 17 फेब्रुवारी 2024 ते 24 एप्रिल 2024 या कालावधीत आरोपींनी जवळपास तीन कोटी 70 लाख 6 हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले फिर्यादी यांनी इतकी मोठी रक्कम गुंतवणूक केली परंतु कोणताही परतावा न मिळाल्याने आपले आर्थिक फसवणूक झाल्याच्या लक्षात येताच सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी आर्थिक फसवणुकी बाबत कलम 419 420 आणि 34 प्रमाणे भादवी माहिती व तंत्रज्ञान सुधार अधिनियमन 2008 कलम 66 (डी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर विभागाच्या पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना शोधण्यास मदत केली आरोपी हे तुर्भे येथील सारस्वत बँक या ठिकाणी बँक खाते उघडण्याकरिता येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दोन आरोपींना अटक आरोपींची नावे
1.सलमान निजामुद्दीन खान (35 वर्ष), घनसोली नवी मुंबई.
2.प्रकाश कर्मशी भानुशाली (39 वर्ष), कोपरखैरणे नवी मुंबई
हे दोन्ही आरोपी गरजू लोकांना पैशाचे आम्हीच दाखवून त्यांच्याकडून बँक खाते उघडण्याकरता आवश्यक कागदपत्रे घेत असेल आणि त्यांच्या नावे सिम कार्ड व कागदपत्राचा वापर करून उदयम प्रमाणपत्र तयार करून एकाच शॉप वर वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने करंट खाते उघडून त्यांच्या दुबई येथील साथीदारांच्या मार्फत आर्थिक घोटाळा करत असल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. दोन्ही आरोपींना 31 मे रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी फिर्यादी याने पाठवलेल्या रकमेतील सर्व बँक खात्याचे रक्कम पोलिसांना गोठविण्यात यश आले असून जवळपास 46 लाख रुपये पोलिसांनी आतापर्यंत गोठविले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर, धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन कदम, पोलीस निरीक्षक विशाल पादीर, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे पोलीस हवालदार कारखेले, फटांगरे, जमदाडे यांनी उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गजानन कदम करित आहेत.