Navi Mumbai Police : पावसाळ्यात नवी मुंबईच्या पनवेल शहरातील गाढेश्वर धरणात अति उत्साही पर्यटनामुळे अपघात होण्याची शक्यता, पोलिसांकडून नियमावली..
Navi Mumbai Police On Waterfall Accident : नवी मुंबईतील धरणाकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी सूचना जारी, कलम 144 अंतर्गत कारवाई होणार..
नवी मुंबई :- पनवेल Panvel Ghadeshwar Waterfall तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला जातो. या परिसरात पर्यटकांनी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असा संदेश पोलिसांकडून देण्यात येत आहे. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी नागरिकांना आवाहन सतर्कतेचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. Panvel Police News
पावसाळा सुरू झाला की अनेकांना धबधब्यांचे वेध लागतात. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेक जण धबधब्यांचा आनंद घ्यायला उत्सुक असतात. मात्र बऱ्याचदा अतिउत्साहपणामुळे काहींना जीवदेखील गमवावा लागतो. नवी मुंबईतील खारघरमधील पांडव कडा, पनवेलमधील गाढेश्वर धरण परिसरात पावसाच्या दिवसांमध्ये तरुणांची गर्दी पाहायला मिळते.अतिउत्साहीपणामुळे अनेकदा पर्यटकांचा जीव संकटात सापडतो. Panvel Police News
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात येणा-या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
1) नदी पात्रात जाणे अत्यंत धोकादायक आहे, नदी पात्रामध्ये बर्याच ठिकाणी मोठे व खोल डोह असल्याने ते समजुन येत नाहीत. आपण आलेले परिसरात पाऊस नसला तरी, माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याचे प्रवाहामध्ये अचानक पणे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजुन येत नसल्याने काही लोकांचा यापुर्वी सदर नदीपात्रात बुडून मृत्यू होवुन ब-याच दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी.
2) लहान मुले, स्त्रीया व ज्या लोकांना पोहता येत नाही, त्या लोकांनी पाण्यात उतरू नये.
3) गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असतो, त्यामुळे सदर नदीपात्रान उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तु टाकून पाणी दुषित करू नये.
4) अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहेण्श् सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
5) परिसर हा डोंगराळ असुन रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अॅम्ब्युलन्स यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला रहावा, यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा त-हेने रस्त्याचे कडेला वाहने उभी करू नयेत, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा त-हेने उभे करण्यात आलेले वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
6) सदर परिसरात वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादीत ठेवावा, तसेच नशा करून वाहन चालवु नये तसे आढळून आल्यास तात्काळ कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
7) परिसरातील वरीलप्रमाणे धोक्याचे अनुषंगाने जनतेच्या जिवीताची व सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेवुन सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाढेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोर्वे धरण, कुंडी धबधबा (अर्पिता फार्म हाऊस जवळील धबधबा) हरिग्राम नदीपात्र, धोदाणी नदीपात्र, चिंध्रण व गोहोदर नदीपात्र, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, या ठिकाणी भेटी देण्यास मनाई आदेशान्वये दिनांक 10 जून 2024 रोजी दिनांक 10 जून 2024 ते दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहीताचे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे.
8) स्थानिक रहीवासी व सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कृती करताना कोणी आढळुन आल्यास तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क ९८१९६७९१०००/०२२२७४५२४४४ तसेच डायल ११२ यावर संपर्क साधुन माहिती द्यावी.