Navi Mumbai Pollice : तंबाखूजन्य पदार्थांचा साठा,दोघांना अटक
Navi Mumbai Police Busted Tobacco’s Dealer: तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित असताना या मालाचा अनधिकृतरित्या विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील पेंधर गाव तळोजा येथे दोघांना अटक
पनवेल :- तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधित Tobacco Selling असताना या मालाचा अनधिकृतरित्या विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील पेंधर गाव तळोजा येथील दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 40 हजार 850 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी Navi Mumbai Police Anti Narcotics पथकाची कारवाई करत गुटखाविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
सतीशसिंग नेपालसिंग ठाकूर (32 वर्ष) आणि जितेंद्र राजकुमार कामत (21 वर्ष) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. राहत्या घरी म्हणजेच पेंधर गाव तळोजा तालुका पनवेल येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाला बेकायदेशीररित्या साठा केल्याचे बातमी मिळाली होती. पोलिसांच्या या पथकाने सापळा रचून छापेमारी केली असता त्यांना त्यावेळी तपासणीत प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांमध्ये विमल असलेल्या पान मसाला, टोबॅकोची पाकिटे, विमल पान मसाला पाकिटे, तैमूर पानमसाला, टी. आर. सुगंधी तंबाखू असा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी आरोपींना चौकशी केली असता गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे दोघांनी कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र शासन गुटखा विक्री मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 123,274,275,223,3(5), सह अन्नसुरक्षा मानके अधिनियमन 2006 मधील कलम 26, 27 (2),(ई),59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश शिंदे हे करीत आहे.
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे शाखा), यांनी नवी मुंबई नशामुक्त करण्याचे व अंमली पदार्थ सेवन, गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु सेवन व विक्री करणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नायडु, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, रमेश तायडे, पोलीस हवालदार उत्तम लोखंडे, विजय पाटील, पोलीस नाईक संजय फुलकर, अंकुश म्हात्रे, पोलीस शिपाई अनंत सोनकुळ या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.