नवी मुंबई : ऑनलाइन लॉटरी अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकून मुद्देमाल जप्त
Navi Mumbai Police Raid On Lottery Adda Kamothe : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कक्ष-3 पोलिसांनी सीबीडी, कामोठे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ऑनलाइन जुगारांच्या अड्ड्यावर छापेमारी केली आहे
नवी मुंबई :- ऑनलाइन लॉटरीच्या Raid On Lottery Adda संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाइन जुगार बंद करा, असे स्पष्टपणे सांगितले होते. नवी मुंबईच्या सीबीडी, कामोठे पोलीस ठाण्याच्या Kamothe Police Station हद्दीत जुगार माफियाकडून ऑनलाइन लॉटरी सुरू असून या ऑनलाइन लॉटरी अड्ड्यांवर गुन्हे शाखा कक्ष 3 पोलिसांनी Crime Branch Police 3 एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Navi Mumbai Police Latest News
सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस पथक सीबीडी पोलीस ठाणे यांनी बस स्टॉप च्या बाजूला शॉप नंबर 10 सेक्टर 6 येथे छापा मध्ये कारवाई करत ऑनलाईन लॉटरी चालवणाऱ्या महेश कुमार गुलाब चंद वर्मा (29 वय), राघवेंद्र उर्फ गोपाळ शेट्टी (49 वय) यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या कारवाईत 47 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे आणि पोलीस पथकाने सेक्टर 6ए नयन को ऑफ औसिक सोसायटी कामोठे नवी मुंबई येथे छापा टाकून अनुप महेंद्र जैस्वाल (31 वय), सुनील कोंडाळे उर्फ निकम (38 वय) यांच्याविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कामोठे पोलीस करत आहे तसेच ऑनलाईन लॉटरीसाठी वापरण्यात आलेले 53 हजार 430 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. Navi Mumbai Police Latest News
मध्यवर्ती गुन्हे कक्षाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुंगेनवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक कोकरे , जाधव, नीलम पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे पोलीस पथकाने सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर 6 नवी मुंबई येथे छापेमारी करून अमर लक्ष्मण कणसे (32 वय) यांच्यासह इतर बारा जणांवर जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई सीबीडी पोलीस करत आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस पथक
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांनी नवी मुंबई आयुक्तालयातील ऑनलाईन जुगारात चालवणाऱ्या आणि खेळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलीस पथक अजयकुमार लांडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदशनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, कक्ष-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, सुरज गोरे, तुंगेनवार, कोकरे, जाधव, निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील, राहूल भदाणे, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, उतम तरकसे, सचिन धनवटे,दिनेश जोशी, पोलीस नाईक राजेश मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस हवालदार