Navi Mumbai Police News : गुन्हे अन्वेषण आणि सीबीडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा सन्मान; वाशी, नेरुळ, कळंबोलीतील उपनिरीक्षकांचा समावेश
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police दलातील पाच धाडसी आणि कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांची नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी ‘विशेष पोलीस सेवा पदक’साठी निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. Navi Mumbai Police Latest
या पदकासाठी राज्यातून एकूण 617 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि सीबीडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त भागात कार्य करताना दाखवलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळणार आहे.
याशिवाय, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार आणि कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभय काळे यांचीही या पदकासाठी निवड झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात सेवा बजावताना दाखवलेल्या तत्परतेचे हे उचित कौतुक आहे.
पोलीस महासंचालकांनी आदेशात नमूद केले आहे की, पदक उपलब्ध झाल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख व घटक प्रमुखांनी समारंभ आयोजित करून हे पदक अधिकाऱ्यांना प्रदान करावे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात या पाचही अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची शक्यता आहे. या सन्मानामुळे नवी मुंबई पोलीस दलाचा मान वाढला असून, कर्तव्यपरायणतेचा हा गौरव असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…