Navi Mumbai Police Drug Raid News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा सापळा यशस्वी | 118 ग्रॅम हेरॉईन आणि 143 ग्रॅम अफिम हस्तगत | ट्रकमधून अंमली पदार्थांची तस्करी झाल्याचा संशय
नवी मुंबई , तळोजा :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाने तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात छापा टाकून 1 कोटी 2 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पंजाबमधून आलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, या रॅकेटमधील एका ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू आहे. Navi Mumbai Latest Crime News
गुप्त बातमीदाराने फोडले बिंग
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना 23 फेब्रुवारी 2026 रोजी एका खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, तळोजा येथील ‘महावीर मॅजेस्टी’ इमारतीत दोन तरुण हेरॉईनची विक्री करत आहेत आणि त्यांनी आपल्या घरात अमली पदार्थांचा मोठा साठा करून ठेवला आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत छापा टाकण्याची योजना आखली.
दोन सख्ख्या भावांना रंगेहाथ पकडले
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने पंचांसमक्ष ‘महावीर मॅजेस्टी’ मधील घोट कॅम्प परिसरात धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील निहालसिंगवाल येथील रहिवासी असलेल्या सुरींदर सिंग उर्फ कालू (24 वय) आणि त्याचा मोठा भाऊ मनिंदर सिंग (27 वय) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा साठा सापडला.
जप्त केलेला मुद्देमाल
हेरॉईन: 118 ग्रॅम (अत्यंत उच्च दर्जाचे)
अफिम: 143.6 ग्रॅम
एकूण किंमत: 1 कोटी 2 लाख 19 हजार 500 रुपये
ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू
या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ पंजाबमधून ट्रकमार्फत आणले गेल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही भावांसह अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनि तुषार माने आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…