नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी शहिदांना वाहिली आदरांजली
नवी मुंबई :- देशात दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो. या वर्षी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2024 रोजी भारत 65 वा पोलीस स्मृती दिन आहे. पोलीस-निमलष्करी दलांशी संबंधित सर्व लोक हा दिवस पोलीस शहीद दिवस किंवा पोलीस परेड दिवस म्हणून ओळखतात. कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस दरवर्षी भारतभर स्मृतिदिन म्हणून पाळला केला जातो. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी स्मृतिदिनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आदरांजली वाहून शहिदांना मानवंदना दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परेड करण्यात आले. Navi Mumbai Police Latest News
लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित अशा ‘हॉटस्प्रींग’ या ठिकाणी 21 ऑक्टोबर 1959 साली 10 पोलीस जवान गस्त घालीत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्याला पोलीस जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, सदर हल्यात 10 पोलीस जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला होता. भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासुन इतरांना स्मृती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणुन हा दिन “पोलीस स्मृतीदिन” म्हणुन पाळला जातो. Navi Mumbai Police Latest News
पोलीस स्मृतीदिनी औचित्य साधुन आज (21 ऑक्टोबर ) हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी शहीद कुटुंबियांना आंमत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये कर्तव्यावर असताना दिवंगत झालेल्या एकूण 216 पोलीस अधिकारी/जवानांचे स्मरण करण्यात आले. शहीदांना मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे हस्ते इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी, इतर मान्यवर व शहीद कुटुंबियांचे उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आलेली आहे. Navi Mumbai Police Latest News