क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Police News News : नवी मुंबई पोलिसांचा हृदयस्पर्शी उपक्रम – हरवलेले 25 लाखांचे 122 मोबाईल परत!

नवी मुंबई | गुन्हे शाखा कक्ष-३ (पनवेल) Navi Mumbai Panvel Crime Branch च्या अथक प्रयत्नांमुळे हरवलेले तब्बल 122 मोबाईल फोन, एकूण किंमत सुमारे 25 लाख रुपये, त्यांच्या खरी मालकांना आज प्रत्यक्ष परत मिळाले. Navi Mumbai Police News

घटना काय?
नवी मुंबईत मोठी लोकसंख्या व सततची ये-जा यामुळे प्रवासादरम्यान, खरेदीच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या भागात मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. या फोनमध्ये नागरिकांच्या महत्त्वाच्या संपर्क, फोटो, व्हिडिओ, आठवणी जतन झालेल्या असल्याने त्यांचा हरवणं म्हणजे केवळ आर्थिक तोटा नव्हे तर भावनिक आघातदेखील आहे. Navi Mumbai Breaking News

CEIR पोर्टलचा हुशारीने वापर
हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आदेश

मा. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,

सह आयुक्त संजय येनपुरे,

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे,

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ
यांनी दिले होते.

पोलिसांचा शिस्तबद्ध पाठपुरावा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने CEIR पोर्टलवरील माहितीचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. विविध सिमकार्ड धारकांशी संपर्क साधत, महाराष्ट्रासह परराज्यातही धाव घेत, मागील तीन महिन्यांत हे सर्व 122 मोबाईल शोधून काढण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाची खास भेट
26 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल फोन त्यांचे खरे मालकांना परत करण्यात आले. आपले मौल्यवान फोन परत मिळाल्याने नागरिकांनी मोठ्या आनंदाने समाधान व्यक्त केले आणि पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

ही चमकदार कामगिरी पार पाडणारे
सपोनि पवन नांदे, पोउपनि अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सफौ अनिल पाटील, पोहवा रमेश शिंदे, प्रशांत काटकर, प्रमोद राजपुत, निलेश पाटील, दिपक डोंगरे, सागर रसाळ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, अजित पाटील, हिरकणी पाटील, पोना आजिनाथ फुंदे, विनया पाटील, पोशि लवकुश शिंगाडे, विक्रांत माळी, प्रसाद घरत यांनी ही मोहिम यशस्वी केली.

नवी मुंबई पोलिसांचा संदेश
हरवलेला मोबाईल फक्त वस्तू नाही, ती आठवणींची पेटी असते. CEIR पोर्टलद्वारे तक्रार केल्यास पोलिस नक्कीच तुमचा मोबाईल परत मिळवून देऊ शकतात—ही खात्री आता नागरिकांना पटली आहे. Navi Mumbai Police News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0