क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Police : नवी मुंबईत कायदा व्यवस्थे चे तीन तेरा पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबई समीर बामुगडे : गुन्हेगारी आणि महिला वरील अत्याचार मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे नवी मुंबई Navi Mumbai आणि आसपास च्या परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे आणि सोबतच गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढत आहे याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत आहे भुरट्या चोऱ्या आणि महिलांची छेडछाड हे प्रकार वाढत आहेत गेल्याच आठवड्यात घडलेली एक ताजी घटना आहे. Navi Mumbai Latest Crime News

खांदा कॉलनी परिसरात नेत्रज्योती हॉस्पिटल जवळील खांदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून १० चे सुमारास एक तरुण महिला आपल्या घराकडे जात असताना एका दुष्ट प्रवृत्ती च्या इसमाने इशारे करून या महिले ची छेड काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या महिले ने धाडस दाखऊन आणि आरडाओरड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो इसम रस्त्याच्या पलीकडे त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या मोटारसायकल (क्रमांक. MH ४६ A७ ८०२०) वरून पळून गेला त्या नंतर ती महिलां खांदा कॉलोनी नजीक चे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करायला गेली असता उपस्थित अधिकाऱ्याने फक्त तोंडी म्हणणे ऐकून घेतले लेखी तक्रार नोंदवून घेतली नाही त्या मुळे त्या महिले ने संताप व्यक्त केला अशा अनेक लहान मोठ्या घटना नेहमी घडत असतात तसेच काही ठिकाणी असलेल्या रेड लाईट एरिया मध्ये तर परिसरातील सामान्य महिलांना वावरणे धोकादायक ठरत आहे त्या पैकीच एक म्हणजे खांदा कॉलोनी परिसरातील एक रस्ता हा वर्दळीचा असतो रोज सायंकाळी साडे ७ ते रात्री १२ पर्यंत या रस्त्यावर काही तृतीयपंथी विकृत अश्लील इशारे करून “गिऱ्हाईक ” शोधत असतात मात्र त्याचा त्रास रस्त्यावरून ये जा करणाऱ्या परिसरातील तरुण महिलांना सुद्धा होत असतो अनेक तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही या गुंड प्रवृत्ती कडे पोलिसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे आता या परिसरात एखादा मोठा गुन्हा होईल तेव्हाच प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे तसेच नवी मुंबई परिसरात गळ्यातील गंथन चोरी व अन्य गुन्हेगारी च्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चींते चे वातावरण आहे. Navi Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0