महाराष्ट्र
Trending

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; वर्षभरात जप्त केले 10 कोटींचे ड्रग्ज

Navi Mumbai Police Take Action Against Illegale Drug Struggler : मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत, “अंमली पदार्थ मुक्त”,नवी मुंबई अभियंतर्गत दहा कोटी रुपयांची अमली पदार्थ नष्ट

नवी मुंबई :- राज्य सरकारचे वनमंत्री गणेश नाईक Minster Ganesh Naik यांच्या उपस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police 2024 या एक वर्षाच्या कालावधीत केलेल्या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट केले आहे. Destroy Drug In Navi Mumbai पोलिसांनी एका वर्षाच्या कालावधीत 39 गुन्हयातील एकण 1 कोटी 61 लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते.

“नशा मुक्त नवी मुंबई” कार्यक्रमाचा बॅन्ड ॲम्बेसिडर म्हणुन प्रसिदध सिने अभिनेता जॉन अब्राहम याची खास नेमणुक करण्यात आली आहे. कार्यक्रमामध्ये नवी मुंबई परिसरातील शाळा-कॉलेज/सोसायटी मधील नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून, त्यांची अंमली पदार्थाचे दुष्परिणाम अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. तसेच अंमली पदार्थाचे अनुषंगाने नागरीकांना माहीती देण्याकरीता 8828-112-112 हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स, होर्डीग्ञ्ज लावण्यात आले. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील शाळा व कॉलेजमध्ये, तसेच रहिवाशी सोसायटी, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेळोवेळी जावुन तेथे विद्यार्थी व नागरीक यांचेमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणामाचे अनुषंगाने जनजागृती करण्यात येत आहे.

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ही सरकार मान्य वेस्ट डिस्पोजल कंपनी असुन या कंपनीमध्ये केंद्रसरकार व राज्य सरकार यांच्या विविध विभागांचे वेगवेगळया प्रकारचे मुद्देमाल नष्ट केले आहे.

2024 एका वर्षाच्या कालावधीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणारे यांचे विरोधात एकण 1143 गुन्हे दाखल करुन 1743 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडुन एकुण 56 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे. त्यामध्ये एकूण 111 आफ्रिकन नागरीकांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन 38 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच सन 2023 व सन 2024 मध्ये नवी मुंबई मध्ये अवैधरित्या राहत असलेल्या 1131 आफ्रिकन नागरीक व 224 बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील एकुण 1128 आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हददपार करून परत पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0