Navi Mumbai Latest News : नवी मुंबईत चालणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करून समाज हादरवून टाकला आहे.Navi Mumbai Sex Racket
गुप्त माहितीवरून सापळा
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना
गुप्त बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की,
सीबीडी बेलापूर सेक्टर १७ येथील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा या आडाख्यात
६,००० रुपयांच्या सौद्याने जबरदस्तीने महिलांकडून देहव्यापार चालवला जात आहे.
बनावट ग्राहकाचा सापळा
२७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बनावट ग्राहकाला स्पामध्ये पाठवून
संकेत मिळताच पथकाने धाडसी छापा टाकला आणि
तेथे १७ महिलांची सुटका केली.
सुटका झालेल्या पीडितांचा तपशील
सुटका झालेल्यांमध्ये –
२ थायलंड, १ नेपाळ,
२ दिल्ली, २ उत्तर प्रदेश,
१ पश्चिम बंगाल, १ गुजरात,
उर्वरित ६ महाराष्ट्रातील महिला आहेत.
आरोपी ताब्यात
स्पाचे मालक मंगेश संजय बांदोडकर (३२)
आणि सफाई कामगार पंकज नारायण माने (४२)
हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात आले.
ते ग्राहकांकडून ६,००० रुपये घेऊन महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत होते.
दोघांविरोधात सीबीडी पोलीस ठाणे येथे
गु.र.नं. ३८७/२०२७ अंतर्गत
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९७६,
तसेच इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून
पोलीस कोठडी मिळवली आहे.
पथकाचा पराक्रम
ही मोहीम
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे,
पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ,
सहाय्यक पोलीस आयुक्त AHTU यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे
आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली.
ही कारवाई केवळ अनैतिक धंद्याला चाप बसवणारी ठरली नसून,
मानवी तस्करीच्या विळख्यात अडकलेल्या १७ महिलांना नवी जीवनाची संधी देणारी ठरली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…