Navi Mumbai Poluce : राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताहात नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: 83 कोटींच्या फसवणुकीची टोळी उद्ध्वस्त

Navi Mumbai Lateste Cyber Crime News : प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे देशभरातील नागरिकांना लक्ष्य; 12 आरोपींना अटक, 886 बँक खात्यांचा वापर
नवी मुंबई :- संपूर्ण देशात राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच, नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंग आणि सायबर फसवणूक करणारी एक मोठी टोळी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत टोळीतील 12 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांनी आतापर्यंत 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.
कारवाई आणि अटकेचा तपशील
फसवणुकीची रक्कम: 83.97 कोटी (प्रथमदर्शी तपासानुसार)
फसवणुकीच्या तक्रारी: एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवर एकूण 393 तक्रारी उघड.
वापरलेली बँक खाती: देशभरातील विविध बँकांची 886 खाती.
या प्रकरणी, अवैध्यरित्या गेमिंग अॅप चालविणाऱ्या आरोपींना बँक खाती पुरवणारा मुख्य आरोपी इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय 22, नेरूळ, नवी मुंबई) याला सीबीडी रेल्वे स्टेशन येथून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल पवार यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून या टोळीचा पर्दाफाश झाला.
अटकेची ठिकाणे आणि पद्धत
1.डोंबिवली (ठाणे): आरोपी इम्रान शेख हा नागरिकांना बँक खाती उघडण्याचे आमिष दाखवून त्यांचे पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड आणि चेकबुक किट स्वतःकडे घेऊन ते डोंबिवली येथील रुनावल गार्डन बिल्डींग नं-4, रूम नं 1301 येथे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. येथे धाड टाकून 5 आरोपींना अटक करण्यात आली.
2.पुणावळे (पिंपरी चिंचवड): पुढील तपासात ही टोळी पुण्याजवळील पुणावळे (पिंपरी चिंचवड) येथील सोमानी ग्रीन होम, फेज-2, बिल्डींग ई विंग, गायकवाड नगर येथे कार्यरत असल्याचे उघड झाले. येथे 16 तारखेला धाड टाकून उर्वरित 6 आरोपींना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या एकूण 12 आरोपींमध्ये इम्रान उस्मानी मिनहाज शेख, हितेश पुनाराम देवांगन, सुनिल श्रवण देवांगन, तोमेशकुमार मोहीत उईके, राहुल राजु देवांगण, अंकीत रमेश सिंग, अभिषेक संजय सिंग, हरिषकुमार मदनलाल, अर्पित संतेन्द्रकुमार सोनवाणी, रजत दिलीप शर्मा, लालबाबु राजेश्वर राम कुमार, कृष्णाअंशु अमित विश्वास यांचा समावेश आहे.
फसवणुकीची कार्यपद्धती
आरोपी त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलच्या तांत्रिक तपासणीत 1.www.Ramesh247.com, 2.www.upl9.Pro.com & 3.http://www.Reddybook.blue अशा ऑनलाईन प्रतिबंधित गेमिंग वेबसाईड/अॅप्लिकेशनद्वारे फसवणूक करत होते. एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवरील तक्रारींमध्ये शेअर मार्केटींग फ्रॉड, जॉब रॅकेटिंग, वर्क फॉर्म होम इत्यादी प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जप्त केलेला ऐवज: अटक केलेल्या आरोपींकडून 52 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 99 वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, 64 चेकबुक, 1 टाटा सफारी कार असा एकूण 18 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.



