Mumbai Police Latest News
Navi Mumbai Chain Snacher News : सी वुड्स सेक्टर 44 मध्ये 1.80 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांसमोर सराईत चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालय क्षेत्रात साखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता चोरट्यांनी थेट पुरुषांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सी वुड्स सेक्टर-44 येथे सकाळी 9.15 वाजता एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून चोरटा फरार झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Navi Mumbai Police Latest News
काय घडले सी वुड्समध्ये?
सी वुड्स सेक्टर-44 येथे राहणारे अमित गौतम (वय 44) हे सकाळी सव्वानऊ वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. सेक्टर 44 ए जवळील ‘नॅशनल सी क्वीन टॉवर’ जवळून ते जात असताना, त्यांच्या मागून एका दुचाकीस्वाराने अचानक येत गाडीचा वेग कमी केला. काही कळण्याच्या आत त्याने अमित गौतम यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून गाडीचा वेग वाढवला आणि क्षणात पळ काढला. अमित गौतम यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याला गाठणे शक्य झाले नाही. Navi Mumbai Latest Chain Snacher News
पोलिसांसमोर आव्हान
पूर्वी सराईत चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि घाईत असणाऱ्या महिलांना लक्ष्य करत असत. मात्र, आता पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सरासरी दररोज किमान तीन साखळी चोरीच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबईत सीसीटीव्हीचे चांगले जाळे असून, सी वुड्स येथील चोरीची ही संपूर्ण घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, घडलेल्या घटनांच्या तुलनेत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याने पोलिसांसाठी या सराईत चोरट्यांना जेरबंद करणे एक मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेलार पुढील तपास करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…