Navi Mumbai Police Latest Operation : व्यापारी पंकेश पाटील यांच्यावर भर रस्त्यात हल्ला करून अपहरण; गुन्ह्याचा थरार वाशीमपर्यंत पोहोचला,आरोपींना अटक, व्यापाऱ्याची नाट्यमय सुटका
नवी मुंबई :- नवी मुंबईतील Navi Mumbai तुर्भे सेक्टर 20 मधील अक्षर बिझनेस पार्क येथे 18 मे 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चक्रावून टाकणारी घटना घडली. भाजीपाला इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसाय करणारे व्यापारी पंकेश संजय पाटील (वय 27) यांचे भर रस्त्यात अपहरण करण्यात आले. पैशांच्या वादातून कट रचून आरोपींनी चक्क धारदार लोखंडी हत्यारांनी हल्ला करत त्यांना जबरदस्तीने कारमध्ये ओढून नेले. त्यांच्यासोबत असलेले व्यावसायिक भागीदार प्रशांत खैरनार (वय 33) यांनी प्रतिकार केल्यावर त्यांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली गेली. Navi Mumbai Police Latest News
घटनेनंतर काही मिनिटांतच खैरनार यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात APMC Police Navi Mumbai धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीसांनी लगेचच गुन्हा भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत नोंदवून गंभीर स्वरूपाचा तपास सुरू केला. मात्र गुन्ह्यात वापरलेली पांढरी स्विफ्ट कार बनावट नंबरची होती आणि अपहरणानंतर कोणताही फिरोतीसाठी संपर्क न आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे कक्ष-1, कक्ष-2, मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि परिमंडळ-1 मधील 5 पथके व एपीएमसी ठाण्याच्या 2 पथकांसह एकूण 8 पथकांची विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ, परिसर, सीसीटीव्ही फुटेज आणि टोलनाक्यांच्या फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास सुरू केला. तक्रारदार आणि त्यांच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली.
या सामूहिक प्रयत्नातून काही तासांतच आरोपींचा मागोवा लागला आणि तपासाची सूत्रे वाशीमकडे वळली. आरोपी ऋषिकेश इंगोले (25 वय, व्यवसाय: एक्सपोर्ट-इम्पोर्ट), मंगेश अस्तरकर (23 वय, व्यवसाय: मिस्त्री), व सागर मनवर (25 वय) हे तिघे व्यापाऱ्याला वाशीमकडे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस पथकांनी 20 मेच्या पहाटे धडक कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि व्यापारी पंकेश पाटील यांची सुखरूप सुटका केली. या यशस्वी ऑपरेशनमुळे नवी मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी टोळीवर मोठा आघात केला आहे.सध्या आरोपींच्या मोबाईलमधील डेटा, संपर्क, आर्थिक व्यवहार यांची सखोल तपासणी सुरू असून, अधिक आरोपींना जेरबंद करण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कार्यवाहीबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1 पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग आदिनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, गुन्हे शाखा, कक्ष-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा, मध्यवर्ती कक्ष चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, एपीएमसी पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, पोलीस निरीक्षक, गुन्हे महेश मांडवे, तसेच एपीएमसी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…