महाराष्ट्र

Maharashtra Political Update : राजकीय रणभूमीवर मोठी खेळी! शिंदे-आंबेडकरांची युती जाहीर

Eknath Shinde Ambedkar Yuti : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) – रिपब्लिकन सेनेचा ऐतिहासिक समझोता

मुंबई | महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे.या युतीची औपचारिक घोषणा एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

“ही युती आजची नाही, ती विचारांची आहे!” – आनंदराज आंबेडकर

पत्रकार परिषदेत बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले,“ही युती फक्त राजकीय नव्हे, ती ऐतिहासिक आणि वैचारिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेपासून सुरू झालेली ही लढ्याची परंपरा आज एकत्र येते आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही दोघे कार्यकर्ते एकत्र आलो आहोत.”त्यांनी स्पष्ट केलं की, “आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळावा, हा आमचा ध्येयवाद आहे. स्थानिक निवडणुकांमध्येही आमचा ठसा उमटावा यासाठीच ही युती आहे.”

“एक सेना ठाकरे घराण्याची, दुसरी आंबेडकर घराण्याची!” – एकनाथ शिंदे

युतीच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,“आमची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना – दोघीही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणाऱ्या सेना आहेत. एक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन चालणारी, तर दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा असलेली. त्यामुळे आम्हा दोघांचं सहकार्य हे प्रभावी ठरणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0