क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात

Navi Mumbai Police Busted Illegal Daru Bhatti : शेलघर गांव, वाडी, येथे गावठी हातभटटीची दारू विक्रीसाठी बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नवी मुंबई :- शेलघर गांव, वाडी, येथे गावठी हातभट्टीची Navi Mumbai Illegal Daru Bhatti दारू विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी Navi Mumbai Police ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनी Navi Mumbai Crime Branch ही कारवाई केली आहे. राम मंगलसिंग वाघमारे (वय-23 रा.शेलघर गांव वाडी, ता. पनवेल, जि. रायगड ) असे गुन्हे शाखेनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

नवी मुंबईच्या गुन्हे शाखेकडून हातभट्टीची दारू उध्वस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार कडून शेलघर गाव स्मशानभूमीच्या मैदानाच्या बाजूस आंब्याच्या वडाच्या झाडाखाली असलेल्या पक्ष खोलीच्या पाठीमागे काही व्यक्ती गावठी दारू विक्रीसाठी गावठी दारू गाळण्याचा व बनवण्याचा धंदा चालू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांन घटनेच्या अनुषंगाने तपासणी करून अवैधरित्या विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू तयार करताना छापा टाकला असता पोलिसांना भट्टीची दारू तयार करत असताना मिळून आल्यावरून 6 हजार 234 किंमतीची गावठी हात भट्टीची दारू व गावठी दारु करणारे साहित्य जप्त करून 650 लिटर 32 हजार 400 रु किंमतीची कच्ची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली असून आरोपी विरुध्द न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 65 (एफ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद आरोपीस नोटीस बजावण्यात आली असुन पुढील तपास न्हावाशेवा पोलीस ठाणे करत आहे. Navi Mumbai Latest Crime News

पोलीस पथक

मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, अमित काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यावर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास दिले होते.धर्मपाल बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक सरीता गुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वास्कर, पोलीस शिपाई चव्हाण,पारासुर, कालते, पोलीस हवालदार अडकमोल, खंडे हे सहभागी होते. Navi Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0