Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची मोक्का कायद्यांतर्गत कारवाई ; दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे तब्बल 10 गुन्हे उकल
Navi Mumbai Crime Branch Arrested Criminal : परराज्यातील सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे परिसरातून अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा करून आश्रयासाठी नवी मुंबईत आल्यानंतर इथेही ते वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागले होते.
नवी मुंबई :- नवी मुंबई शहरात Navi Mumbai City घडणाऱ्या वाहनचोरी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांच्या Navi Mumbai Police हाती दिल्लीचे सराईत गुन्हेगार लागले आहेत. पोलीसांनी या सराईत टोळीच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. दिल्ली आणि नवीमुंबई 10 पेक्षा अधिक गंभीर व वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.नवी मुंबईत चार गुन्ह्यातच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. Navi Mumbai Police Latest News
वाशी, जुईनगर, कळंबोली, कामोठे, सीबीडी परिसरात मागील महिन्यात सलग मोटरसायकल चोरीचे व सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक केले होते. त्यात सहायक निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सतीश भोसले, नीलम पवार, शशिकांत शेंडगे, उर्मिला बोराडे, अनिल यादव, संजय राणे आदींचा समावेश होता. या पथकांनी गुन्हे घडलेल्या परिसराची पाहणी करून संशयितांची माहिती मिळवली होती. त्यात उलवे परिसरात ते राहत असल्याचे समोर आले होते. त्यावरून उलवे परिसरातील 40 ते 50 सोसायटींमधील रहिवास्यांची माहिती पोलिसांनी तपासली होती. यावेळी एका गेस्ट हाउसमध्ये सर्वजण राहत असल्याचे समोर येताच सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले.कामोठे पोलीस ठाण्यात कलम 309(4), (6) भा.न्या. संहिता 2023 (भा.दं. वि. सं. कलम 392, 34) या गुन्हयात ऑक्टोंबर मध्ये अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News
अटक आरोपींचे नाव
1.सागर जुगेश मेहरा,( वय 27 वर्षे रा. भागवत राज्य उत्तर प्रदेश)
2.अभय सुनिलकुमार नैन, (वय 19 रा. ता.भागवत राज्य उत्तरप्रदेश)
3.शिखा सागर मेहरा, (वय 27 रा. टिळकनगर, दिल्ली)
4.अनुज विरसींग छारी, (वय 24 रा. कोपरखैरणे, नवी मुंबई)
उघडकिस आलेले गुन्हे
गुन्हयातील अटक आरोपींकडुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील जबरी चोरीचे 07 गुन्हे, वाहन चोरीचे 02 गुन्हे व दिल्ली आयुक्तालयातील जबरी चोरीचा 1 असे एकुण 10 गंभीर गुन्हे उघडकिस आणले आहेत.
हस्तगत मालमत्ता
1 सोन्याचे मंगळसुत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकुण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 केटीएम मोटार सायकल असा एकूण किंमत रु.7, लाख 70 हजार Navi Mumbai Police Latest News
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिला संबंधिच्या गुन्हयांना प्रतिबंध करणे व रस्त्यावर घडणारे गुन्हे (Street Crime) प्राधान्याने उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.अटक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी प्राप्त पुरावे याचे अवलोकन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी त्यांचेविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यास अपर पोलीस आयुक्त, गुन्हे दिपक साकोरे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनिय 1999 चे कलम 3 (1), (Ⅱ), 3 (2), 3 (4) कलमान्वये कारवाईची मंजुरी दिली असुन सहाय्यक पोलीस आयुक्त, भाउसाहेब ढोले, आर्थिक गुन्हेशाखा, नवी मुंबई हे पुढील तपास करीत आहेत. Navi Mumbai Police Latest News