क्राईम न्यूज

Navi Mumbai Police : वेश्याव्यवसायातून ९ महिलांची सुटका; ६ जण अटकेत

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या Navi Mumbai Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एपीएमसी परिसरातील दोन ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी अडकवून ठेवलेल्या ९ महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. Navi Mumbai Latest Crime News

Milind Bharambe, police commissioner,

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे व उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून “व्दारका रेसिडन्सी, सेक्टर-१९/सी, एपीएमसी, नवी मुंबई” येथे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या संकेतावर पोलिसांनी छापा टाकून ४ महिलांची सुटका केली. यावेळी लॉज मॅनेजर मोहम्मद मुनातुल्ला शेख उर्फ बबलु, मॅनेजर मोहम्मद वकील शेख, रूम बॉय नजरूल आलम, तसेच रिक्षाचालक विकास भुनिया यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर पिडीत महिलांच्या माहितीनुसार कोपरखैरणे सेक्टर-१२ मधील एका ठिकाणी दुसऱ्या छाप्यात आणखी ५ महिलांची सुटका झाली. येथून रूम मॅनेजर जहागिर मोल्ला आणि रिक्षाचालक सिताराम यादव यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुख्य आरोपी सुधाकर पालन, अब्दुल तरफदार आणि राजू बंगाली हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago