मुंबई
Navi Mumbai News : खैरण्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले भालेराव कुटुंबीयांच्या भेटीला

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सहभाग असलेले नंदकुमार भालेराव यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भालेराव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी दि. 3 जाने रोजी भालेराव कुटुंबीयांच्या खेरने बोनकोडे येथील राहत्या घरी भेट दिली. यावेळी आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ, महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई बोदडे, जिल्हा सचिव रमेश बोदडे, यशपाल ओहोळ, फैयाज भाई आदींसह नवी मुंबईतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.