मुंबई

Navi Mumbai News : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! ‘रेशमा केमिकल्स’ कंपनीला आगीचं जबर नुकसान

Navi Mumbai MIDC Fire News : सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप

नवी मुंबई :- तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगर परिसरात असलेल्या ‘रेशमा ऑर्गेनिक केमिकल्स’ या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज पहाटे सकाळी 4.37 वाजता अचानक आग लागली. रासायनिक साठा आणि ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

ही कंपनी भूखंड क्रमांक D-61 वर असून, तिथे असलेल्या प्लांटमध्ये स्फोटक आणि ज्वालाग्राही रसायनांचा मोठा साठा होता. नेरुळ अग्निशमन दल पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, आग इतकी प्रचंड होती की लगेचच वाशी आणि सीबीडी बेलापूर येथूनही अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली, याचा नेमका कारण अजून अस्पष्ट आहे. तसेच, हानीचे अंदाजे प्रमाण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.

सुदैवाने, या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन विभागाने दिली. मात्र, रासायनिक संयंत्र असल्यामुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले असून आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अग्निशमन दलाच्या अंदाजानुसार, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवायला किमान दोन तास लागतील. दरम्यान, अग्निशमन अधिकाऱ्यांकडून कंपनीतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आगीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

51 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago