•Special helpline number inaugurated in Navi Mumbai for anti-corruption awareness भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ACB चा पुढाकार; शासकीय कामात लाच मागितल्यास 9920351064 या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा
नवी मुंबई :- प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता यावी या प्रमुख उद्दिष्टाने अँटी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई कार्यालयामार्फत आज परिसरातील नागरिकांसाठी एका विशेष सार्वजनिक हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि त्यांनीच या हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण केले. यावेळी नवी मुंबई कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्यासह पोलीस निरीक्षक सुधीर निकम, किरणकुमार वाघ आणि अरुंधती येळवे उपस्थित होते.
भ्रष्टाचार आढळल्यास त्वरित तक्रार करा
नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालय, कंत्राटी प्रक्रिया किंवा इतर सरकारी कामात लाच मागितल्यास किंवा कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
प्रमुख अतिथी शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, “भ्रष्टाचार विरुद्धचा लढा ही केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जागरूक नागरिक हेच प्रामाणिक शासनाचे सर्वात मोठे बळ आहे.”
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी असल्यास त्यांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई येथे टोल फ्री क्रमांक 1064, दुरध्वनी क्रमांक 022-27833344 किंवा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक 9920351064 यावर संपर्क साधावा.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…