मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांनी अनाथ मुलांन सोबत केला वाढदिवस साजरा…

नवी मुंबई (रुपाली वाघमारे) : नवी मुंबई येथील एकेकाळचे नवाकाळ चे पत्रकार व आजचा सातारा सांगली साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक मोहन आकाराम वाघमारे यांनी ३० जून रोजी त्यांचा ७१ वा वाढदिवस नवी मुंबई नेरूळ येथील जीवन ज्योती अनाथालय आश्रमात मुलांसोबत मोठ्या आनंदात केक कापून, मुलांना फळ वाटप करत आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी मुलांना खाऊचे व फळांचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी आजची उद्योग नगरीचे संपादक कुमारी रूपाली वाघमारे, उपसंपादक मिलिंद तोरणे व उमेश सकट, रानी उमेश सकट, कुमारी तृषा सकट, कुमार वीर तोरणे, कुमार युगांक सकट परिवा प्रतिनिधी इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी जीवन ज्योती अनाथालयाचे मुख्य सचिन जाधव यांनी स्वागत करून मुलांच्या विषयी व संस्थेविषयी माहिती दिली यामध्ये बहुसंख्य मुले आई-वडिलांनी सोडून दिलेले होती. मुलांच्या आनंदात समावेश झाला, त्यांच्या निरागस भावना अगदी जवळून अनुभवयाला मिळाला. योग्य ठिकाणी आज मी वाढदिवस साजरा करत असल्याबद्दल मनोगत ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

vivek

Recent Posts