ठाणे

Navi Mumbai News : नवी मुंबई निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; 127 मतदारांचा पत्ता चक्क ‘महापालिका आयुक्तांचे निवासस्थान’

Gajanan Kale On Election Commission : ‘सुलभ शौचालय’, ‘पामबीच रस्ता’ नंतर आता नवीन घोळ; मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली पोलखोल

नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या Navi Mumbai Muncipal Corporation Election आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीत होत असलेला निवडणूक आयोगाचा कथित भोंगळ कारभार मनसेकडून सातत्याने उघडकीस आणला जात आहे. मतदारांच्या नोंदणीत ‘सुलभ शौचालय’ आणि ‘पामबीच रस्ता’ असे अयोग्य पत्ते नोंदवले जात असताना, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 127 मतदारांच्या नावापुढे थेट नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निवासी पत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest News

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हे प्रकार उघडकीस आणत निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

नेमका घोळ काय आहे?

काही दिवसांपूर्वी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील जुईनगर येथील सेक्टर-23 मधील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर एका व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी झाल्याचा प्रकार समोर आला होता.

त्यानंतर पामबीच रस्त्यावरच 250 मतदारांची नोंद झाल्याचे यादीत नमूद करण्यात आले होते.

आता गजानन काळे यांनी बेलापूर विधानसभेची 300 क्रमांकाची यादी सादर केली आहे. यात ‘नेरूळ रेल्वे स्थानक ते पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास’ या पत्त्यावर चक्क 127 मतदारांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचे हे सरकारी निवासस्थान आहे, आणि एकाच ठिकाणी 127 मतदारांची नोंदणी होणे हा मोठा घोळ असल्याचे काळे यांनी सांगितले. या यादीत मोठ्या प्रमाणावर अमराठी आणि परराज्यातील मतदारांची नावे असल्याची माहितीही काळे यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी प्रक्रियेला वेग दिला जात आहे, परंतु यादीत सातत्याने होणाऱ्या अशा चुकांमुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago