Gajanan Kale On BMC Election :‘सुलभ शौचालय’, ‘पालिका आयुक्त निवास’ पत्त्यावरील भोंगळ कारभारावर नागरिकांचे लक्ष वेधणार; भाजप नेत्यांना खोचक निमंत्रण
नवी मुंबई :- मतदार यादीतील भोंगळ कारभारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर आता नवी मुंबईतील मनसेने थेट ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ भरविण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील मतदारांना यादीतील घोळ समजावा, यासाठी मनसेच्या वतीने वाशी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या घोळामुळे प्रदर्शन
नवी मुंबईच्या मतदार यादीत सुलभ शौचालय, पालिका आयुक्त निवास, पामबीच रोड अशा धक्कादायक पत्त्यांवर अनेक मतदारांची नावे नोंदवली गेल्याचे समोर आले होते. मनसेने वारंवार यावर आवाज उठवला असून, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनीही या गंभीर प्रकारावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे मनसेने हे पाऊल उचलले आहे.
प्रदर्शनाचा तपशील
आयोजक: मनसे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे
स्थळ: वाशी येथील सेक्टर-9 ए जवळील दैवज्ञ भवन सभागृह
वेळ: शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
उद्घाटन: मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
गजानन काळे यांनी नवी मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
भाजप नेत्यांना खोचक टीका आणि निमंत्रण
मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने भाजप नेत्यांवरही खोचक टीका केली आहे.
काळे म्हणाले, “निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाप्रमाणेच वागायचे आणि त्यांच्या कलेने घ्यायचे ठरवले आहे, तर निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे आशिष शेलार आणि भाजपचे सर्व नेते त्यांनी सुद्धा या प्रदर्शनाला यावे. सर्वसामान्य मतदारांनी हे लक्षात ठेवावे, या प्रदर्शनातून आपल्याला उत्तर मिळेल की, भारतीय जनता पक्षाला आणि निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची घाई का झाली आहे.”
मनसेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…