क्राईम न्यूज

Navi Mumbai News : मुंबई विमानतळाची ‘गोपनीय’ माहिती असलेला लॅपटॉप चोरीला! ऐरोलीत कारच्या काचा फोडून चोरट्यांचा डल्ला; रबाळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai Latest Crime News : अदानी समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापकासह तिघांचे लॅपटॉप लंपास; मोबाईल लोकेशन मिळूनही पोलिसांनी वेळीच प्रतिसाद न दिल्याने चोरटे पसार

नवी मुंबई | नवी मुंबईतील ऐरोली परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीने आपला मोर्चा आता अतिसंवेदनशील माहिती असलेल्या साहित्याकडे वळवला आहे. मुंबई विमानतळाच्या कामकाजाची अत्यंत गोपनीय माहिती असलेला लॅपटॉप आणि पासपोर्ट ऐरोली सेक्टर 10 मधून चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे चोरटे निसटल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

अदानी ‘एअरपोर्ट’ ग्रुपमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर) पदावर कार्यरत असलेले रमेशकुमार सुंदरम हे बुधवारी रात्री ऐरोली सेक्टर 10 मध्ये घराच्या शोधात आले होते. आपल्या मित्राची वाट पाहत असताना ते एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी आपली कार हॉटेलबाहेर रस्त्यालगत उभी केली होती. साधारण तासाभरानंतर ते परतले असता, त्यांना कारच्या मागच्या बाजूची काच फुटलेली दिसली. तपासणी केली असता कारमधील लॅपटॉपची बॅग आणि पासपोर्ट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

एकाच वेळी दोन गाड्या लक्ष्य
केवळ सुंदरम यांचीच नाही, तर त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारचीही काच फोडून चोरट्यांनी गुरुप्रसाद डांगरे, सचिन देवघरे आणि अमित साळवी यांचे लॅपटॉप व मोबाईल चोरले. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago