
Mira Road Sex Racket Busted News : अंधेरीतील हाय-प्रोफाईल क्लबमधून मीरा रोडला मुलींची ‘डिलिव्हरी’, महिला एजंट अटकेत
मीरा रोड | शहराच्या झगमगाटामागे लपलेलं काळं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे! अंधेरी वेस्टमधील नावाजलेल्या नाइट क्लबमधून तरुणींना फूस लावून देहव्यापारात लोटणाऱ्या महिला एजंटला मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या AHTC युनिटने थरारक कारवाई करत जेरबंद केलं. दोन पीडित तरुणींना नरकसदृश दलदलीतून बाहेर काढण्यात आलं आहे. Mira Road Latest Crime News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रचण्यात आलेल्या जाळ्यात सापडलेली ही महिला एजंट गेल्या वर्षभरापासून मुंबई, लोणावळा, गोरेगाव आणि मीरा रोडमध्ये ‘बॉडी सप्लाय’ करत होती. क्लबमध्ये काम करणाऱ्या मुलींचे फोटो VIP ग्राहकांना पाठवले जात होते आणि त्यांची ‘डिलिव्हरी’ थेट लॉजमध्ये होत होती!
क्राईम ब्रँचचा सापळा यशस्वी! दोन तरुणींना सेक्स रॅकेटमधून थेट नरकातून बाहेर काढलं
मीरा रोड येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात बोगस ग्राहकाच्या माध्यमातून AHTC टीमने सापळा रचला. काही वेळातच आरोपी महिला पोहोचली आणि छापा टाकताच गुन्हे शाखेने तिला ताब्यात घेतलं. तिच्या कब्जातून दोन तरुणींना मुक्त करण्यात आलं.
ही एजंट कोणत्या क्लब्सशी संबंधित होती? तिच्या संपर्कात अजून किती तरुणी आहेत? आणि या साखळीत कोणकोण गुंतले आहे? याचा आता सखोल तपास सुरू झाला आहे.
गुन्हे शाखेने तिच्यावर BNS कलम 143(3) आणि PITA कायदा कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणींना महिला सुधारगृहात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील, अनिल पवार, रामचंद्र पाटील, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे हि कारवाई पार पाडली आहे.



