क्राईम न्यूज

Navi Mumbai News : कळंबोलीत गुटखा वाहतूक पकडली; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Police Latest News : जेवण करायला निघालेल्या पोलिसांना दिसली संशयित मोटार, पाठलाग करून केला पर्दाफाश

पनवेल,कळंबोली :- मुंब्रा-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल येथे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुटख्याची मोठी वाहतूक पकडण्यात आली आहे. एका होंडासिटी मोटारीतून लाखो रुपयांचा सुगंधी पानमसाला आणि तंबाखू मिश्रणाचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांची नावे समोर आली आहेत. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक होत आहे. Navi Mumbai Police Latest News

अशी पकडली गुटख्याची गाडी

शनिवारी दुपारी अडीच वाजता कळंबोली वाहतूक पोलीस विभागाचे हवालदार उमेश कराळे आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर राठोड हे जेवणासाठी निघाले होते. त्याच वेळी, कळंबोली सर्कलजवळून एक होंडासिटी मोटार भरधाव वेगाने जाताना दिसली. संशय आल्याने या दोन्ही पोलिसांनी त्या मोटारीचा पाठलाग करून ती थांबवली. चौकशी केल्यावर चालकाने सुरुवातीला मोटारीत घरगुती सामान असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी गोण्या उघडून तपासणी केल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. Navi Mumbai Take Action Against Again Illegal Drug Peddler

या मोटारीत सहा मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आशिकी सुपाऱ्यांचे लहान पाकिटे आणि अठरा मोठ्या पिशव्यांमध्ये तंबाखू मिश्रणाचे पाकिटे भरलेली होती. पोलिसांनी एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि अडीच लाख रुपयांची मोटार जप्त करून ती कळंबोली पोलीस ठाण्यात आणली.

व्यापाऱ्यांची नावे समोर

कळंबोली पोलीस ठाण्याचे kalamboli Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हा दाखल केला. या सुगंधी पानमसाल्याचा वापर प्रतिबंधित गुटख्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. मोटारचालकाची चौकशी केली असता, त्याने मुंब्रा आणि पनवेल येथील दोन व्यापाऱ्यांची नावे दिली आहेत. पोलिसांनी या व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले असून, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत. कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. Navi Mumbai Police Latest News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago