क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai News : नवी मुंबईत खळबळ! बनावट पोलीस बनून ‘क्रिप्टो’च्या नावाने 3.58 लाखांची लूट

Navi Mumbai Cyber Fraud : तुर्भे एमआयडीसीत एकाच आठवड्यात ‘धाड’ टाकून फसवणुकीची दुसरी घटना; टोळी सक्रिय झाल्याचा पोलिसांना संशय

नवी मुंबई (तुर्भे) :- नवी मुंबई परिसरात पुन्हा एकदा ‘बनावट पोलीस’ बनवून लूटमार करणाऱ्या एका टोळीने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. Navi Mumbai Cyber Fraud स्वस्तात क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष दाखवून खारघर येथील बांधकाम व्यावसायिक हर्ष गुप्ता यांची 3 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात Turbhe MIDC Police कबीर आणि विशाल यांच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Latest Crime News

फिर्यादी हर्ष गुप्ता यांची कबीर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाल्यानंतर कबीरने त्यांना क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष दाखवले. 12 नोव्हेंबर रोजी ठरल्याप्रमाणे दुपारी तुर्भे येथील मार्शल कंपनीजवळ त्यांची भेट झाली. त्या ठिकाणी कबीरचा साथीदार विशाल आणि अन्य एक व्यक्ती उपस्थित होते. मात्र, काही वेळातच एका कारमध्ये दोन ‘पोलीस’ आले आणि त्यांनी हातातील पुडक्याची तपासणी करावयाची आहे, असे सांगून फिर्यादींच्याकडील 3 लाख 50 हजार ठेवलेले पुडके घेतले. काही कळण्याच्या आतच हे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. Navi Mumbai Latest Crime News

यापूर्वी मागील आठवड्यात याच परिसरात स्वस्तात सोने आणि नव्या नोटा देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची 33 लाख रुपयांची फसवणूक झाली होती, त्यातही बनावट पोलिसांनी धाड टाकल्याचा बनाव केला होता. दोन्ही गुन्ह्यांमध्ये कमी वर्दळीच्या ठिकाणी बोलावून ‘धाड’ टाकल्याचा आभास निर्माण करून लूट करण्याची पद्धत समान आहे. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अशी गुन्हे करणारी एखादी टोळी सक्रिय झाली आहे का, या दिशेने पोलीस कसून तपास करत आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावध राहण्याचे आणि फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0