मुंबई
Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण उप आयुक्तांची डान्सबार , पबवर रात्रभर कारवाई……
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका , पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई शहरातील डान्सबार, पब , बार, अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख राहूल गेटे यांच्या पथकाकडून रात्रभर ही कारवाई करण्यात आली. वाशी , तुर्भे,नेरूळ , सीबीडी येथील १० डान्सबार, ५ पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई केली.चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, परवानगी पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. यावेळी पब , डान्स बार मधील नियमबाह्य बांधकाम तोडण्यात केल जमीन दोस्त.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे अतिक्रमण उप आयुक्त डॅा राहूल गेटे यांनी सांगितले.