Navi Mumbai Police Busted Drug Smuggler : पंजाबहून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीचा सीबीडी बेलापूरमध्ये भांडाफोड,अंमली पदार्थ विरोधी पथकाची फिल्मी शैलीतील कारवाई; 4 दिवसांत 9 जणांना अटक
नवी मुंबई | नवी मुंबईत अंमली पदार्थ विक्रीचा Mumbai Police Drug Racket मोठा डाव उधळून लावत अंमली पदार्थ विरोधी पथकाने थरारक कारवाई केली. पंजाबहून हेरॉईन घेऊन आलेल्या टोळीवर सापळा रचून एकूण 47 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने नवी मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 जुलै रोजी सी-शोर लॉज, सीबीडी बेलापूर येथे फिल्मी स्टाईल सापळा रचून पहिल्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून उलगडलेल्या माहितीच्या आधारे पुढील चार दिवसांत इतर सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
जप्त केलेला माल हा सुमारे १२० ग्रॅम वजनाचा हेरॉईन असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास ४७ लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पंजाब आणि नवी मुंबई दरम्यान सुरू असलेले अंमली पदार्थांचे मोठे जाळे समोर आले आहे.
अटक आरोपींमध्ये पंजाबमधील कपुरथला, तरंतारन यांसारख्या भागांतील रहिवासी असून, काहीजणांनी सध्या नवी मुंबईत निवास केलेला आहे. आरोपींमध्ये काहींनी नवी मुंबईतील दिवाळे गाव आणि सीबीडी बेलापूर येथे तात्पुरते ठाण मांडले होते. त्यांचा उद्देश लॉज किंवा भाड्याच्या घरातून ड्रग्ज विक्रीचा रॅकेट चालवण्याचा होता.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज गोरे, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील इतर अधिकाऱ्यांच्या समन्वयातून पार पडली.
1.परमजीतसिंग महिंदरसिंग (रा. पीरावल, सुराखपूर, कपूरथला, पंजाब)
2.सुखविंदर दारा सिंग (रा. तुड, जिल्हा – तरंतारन, पंजाब)
3.अरविंद रामशंकर प्रसाद (उर्फ डिझेल), (वय 30 रा. आग्रोळी गाव, सेक्टर-29, मंगलज्योत बिल्डिंग, बेलापूर, नवी मुंबई)
4.मनप्रीत उर्फ पप्पु कुमार (सध्या रा. दिवाळे गाव, बेलापूर, मुळगाव – पंजाब)
5.मोनू चंदेरसिंग (रा. दिवाळे गाव, बेलापूर, नवी मुंबई, मूळ रा. पंजाब)
6.हरप्रीतसिंग तारसेमसिंग (उर्फ हॅप्पी) (रा. दिवाळे गाव, बेलापूर, मूळ रा. पंजाब)
7.गुरप्रीतसिंग बलविंदरसिंग भट्टी (उर्फ पाडा) (रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, मूळ रा. पंजाब)
8.सतनामसिंग सुखदेवसिंग (रा. तुड, ता. खदुरसाहिल, जि. तरंतारन, पंजाब)
9.सुखविंदरसिंग मुकनारसिंग (रा. खदुरसाहिल, जि. तरंतारन, पंजाब)
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…