Raj Thackeray On Election : ‘मनपा आयुक्त निवास’ केवळ ‘लँडमार्क’ म्हणून वापरले, पत्त्यात उल्लेख नाही; मतदारांचा अपमान होत असल्याची राज ठाकरेंची टीका
नवी मुंबई :- मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी मतदार याद्यांमधील गैरप्रकारांवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील मनपा आयुक्तांच्या Navi Mumbai Muncipal Corporation अधिकृत निवासस्थानावर 130 मतदारांची नोंदणी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यावर आता ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. Navi Mumbai Latest News
जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांनी मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालाचा आधार घेत स्पष्ट केले की, ही बातमी वास्तवाशी विसंगत आहे.
मतदार यादीच्या भाग क्रमांक 300 मध्ये ‘नेरुळ सेक्टर-21, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास’ असे विभागाचे नाव (Section Name) नमूद आहे.
हे नाव केवळ त्या विभागाचे ठळक ओळखचिन्ह (Landmark) म्हणून वापरले गेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराच्या पत्त्यावर किंवा नोंदणीत “नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असा थेट उल्लेख नाही. त्यामुळे, बातमीत नमूद केलेली माहिती चुकीची आहे, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
राज ठाकरेंचा हल्लाबोल कायम
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींवर आपला हल्ला कायम ठेवला आहे.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मागणी केली की, “मतदार याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या. एक वर्ष आणखी लागलं तरी चालेल.”
त्यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारांवरून खेळातल्या मॅच फिक्सिंगची उपमा देत टीका केली, “क्रिकेटमध्ये मॅच फिक्स झाल्यावर खेळाडूंना काढतात, इथे मॅच फिक्स असूनही कोणाला काढत नाहीत.”
मतदार उन्हा-तान्हात रांगेत उभे राहून मतदान करतो, पण निकाल चुकीचे लागणार असतील तर तो मतदाराचा अपमान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन दुबार मतदार संपवण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पुनर्जन्मावर विश्वास नसल्याचे सांगत, या जन्मात महाराष्ट्राचे भले व्हावे यासाठी आपण लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…