मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबईत लेट नाईट डान्स बारवर कारवाईची मागणी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता

नवी मुंबई महाराष्ट्र मिरर : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पळस्पे, कोन, आसुडगाव, कळंबोली, पनवेल, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे आणि एपीएमसी परिसरात लेडीज कम डान्स बार अवैधरित्या पहाटेपर्यंत सुरू असल्याने येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी गृहमंत्री योगेश कदम यांनी स्वतः स्ट्रिंग ऑपरेशन करून या डान्स बारमधील गैरप्रकार उघडकीस आणले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, या बारवर केवळ दिखाऊ कारवाई होत असून, प्रत्यक्षात पहाटेपर्यंत हे बार बिनदिक्कतपणे सुरू आहेत.

या प्रकरणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अवैध डान्स बार सुरू असतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त देवें भारती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच प्रकार घडल्याने तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांना तातडीने निलंबित केले होते. याच धर्तीवर नवी मुंबईतही कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून या प्रकरणात काय पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0