मुंबई

Navi Mumbai News : खुनाच्या गुन्ह्यातील 13 वर्षांपासून फरार आरोपीला नागपूरमधून अटक

•रबाळे पोलीस ठाण्यातील 2012 सालच्या खुनाचा गुन्हा उघड; 25 हजार रुपयांसाठी केली होती हत्या

नवी मुंबई: तब्बल 13 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने नागपूरमधून अटक केली आहे. 2012 मध्ये रबाळे येथे 25 हजार रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या करून हा आरोपी फरार झाला होता. अनेक वर्षांपासून तपास थांबलेल्या या गुन्ह्याची आता उकल झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त, सह आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील 20 वर्षांतील प्रलंबित आणि संवेदनशील गुन्ह्यांचा तपास पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने 2012 सालच्या रबाळे पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. 15 ऑक्टोबर 2012 रोजी भावनखन उगन यादव (वय 50) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपी छोटू उर्फ मर्कट यादव याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही आणि केस ‘अ’ वर्ग समरीमध्ये बंद करण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी तात्काळ एक पथक नागपूरला पाठवले. या पथकाने सापळा रचून आरोपी छोटू उर्फ छटू मर्कट यादव (वय 36 याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या केल्याची कबुली दिली. मयत व्यक्तीने त्याचे 25 हजार रुपये परत दिले नसल्याने त्याने ही हत्या केली होती.

ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, संजय पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपासकामी आरोपीला रबाळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0