क्राईम न्यूज

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांचा सायबर ‘महाठगा’वर दणका! 4 कोटींचा ‘गोल्ड ट्रेडिंग’ गंडा घालणारा ठाण्यातून जेरबंद; 17 राज्यांतील पोलीस होते मागावर

Navi Mumbai Latest Cyber Crime News : गुंतवणुकीच्या नावाखाली लुटले 4 कोटी 23 लाख; सायबर सेलने तांत्रिक सापळा रचून आवळल्या मुसक्या

बेलापूर | गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली Gold Trading गुंतवणुकीवर अफाट नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची लूट करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्पेश कमलाकर शितप (47 वय) असे या आरोपीचे नाव असून, त्याने केवळ एका व्यक्तीलाच नाही तर देशातील 17 राज्यांमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. Navi Mumbai Cyber Crime

आमिष नफ्याचे, जाळे फसवणुकीचे!

फेब्रुवारी 2025 पासून या फसवणुकीच्या खेळाला सुरुवात झाली. आरोपीने सोन्याच्या व्यापारात (Gold Trading) गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन फिर्यादीला दिले होते. विविध क्लुप्त्या वापरून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडले. बघता बघता ही रक्कम 4 कोटी 23 लाख 630 रुपयांपर्यंत पोहोचली. जेव्हा परतावा मिळण्याची वेळ आली, तेव्हा आरोपीने संपर्क तोडल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

चंदणवाडीतील ‘सेफ हाऊस’वरून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक आणि ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले होते, त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी ठाण्यातील चंदणवाडी परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने या भागात सापळा रचून 28 जानेवारी 2026 रोजी कल्पेश शितपला शिताफीने ताब्यात घेतले.

देशव्यापी सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश

अटकेनंतर झालेल्या चौकशीत थक्क करणारी माहिती उघड झाली आहे. आरोपी कल्पेश शितप याचा देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये विविध सायबर गुन्ह्यांत सहभाग आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये बोगस खाती उघडून फसवणुकीचा मोठा ‘नेटवर्क’ तयार केला होता. हे रॅकेट देशभर पसरलेले असून, यामागे मोठे सायबर सिंडिकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कठोर कारवाई आणि आवाहन
आरोपी कल्पेश शितप याला सध्या 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या रॅकेटमधील इतर साथीदारांचा आणि फसवणुकीच्या रकमेचा शोध आता पोलीस घेत आहेत.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago