Navi mumbai metro : पेंधर मेट्रो तिकीट दरात कपात करण्याची मागणी
नवी मुंबईः बेलापूर-पेंधर मार्गावरील मेट्रो तिकीट Navi mumbai metro दरात कपात करा तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. Navi mumbai metro
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करत आहेत. खारघर तसेच परिसरातील इतर सेक्टर व गावातील रहिवाशांना नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यामुळे प्रवासाचा अजून एक सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु मेट्रोच्या तिकीट दरात कपात करणे गरजेचे आहे. सध्याचे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाहीत, असे नेत्रा पाटील Netra Patil यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.Navi mumbai metro
शहरात विविध नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने शेकडो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असून खारघर हे मेट्रोचे स्थानक महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मासिक पाच योजना सवलतीच्या दरात सुरू करण्यात यावी अशी मागणी नेत्रा पाटील यांनी केली आहे. Navi mumbai metro