क्राईम न्यूजमुंबई

नवी मुंबई : 24 लाख रुपयांचा एम.डी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, दोन ड्रग्ज पेडलरांना अटक

Navi Mumbai Police Arrested Drug Peddlers : वाशीच्या सेक्टर-17 सिग्नल जवळ दोन ड्रग्ज माफियांना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई :- नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या Vashi Police station हद्दीत सेक्टर-17, सिग्नल जवळ टायटन शोरूम च्या परिसरात अंमली पदार्थ विक्री Drug Selling In Navi Mumbai करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आले असून,त्याच्याकडून 121 ग्रॅम वजनाचा 24.20 लाख रुपयांचा एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक केले आहे. Navi Mumbai Police Latest Crime News

सलाम इस्लाम खान (45 वर्ष रा. कोनगांव,कल्याण), मोहसीन अस्लम खान (37 वर्ष रा.उलवे नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोघेही जण पदार्थ विक्री करण्यासाठी नवी मुंबईच्या वाशी परिसरातील टायटन शोरूम जवळ सेक्टर 17 येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. अजयकुमार लाडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदशनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,निरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर,रमेश तायडे, विजय पाटील, उत्तम लोखडे, गणेश पवार, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे,संजय फुलकर, पोलीस शिपाई अंनत सोनकुळ, महिला पोलीस शिपाई योगिता शेळके यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.आरोपींची झडती घेतली असता त्याच्या कडून 121 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ असल्याचे समोर आले. आरोपींच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात कलम 8 (क), 22 (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खान यांची चौकशी केली असता अंमली पदार्थ विक्री करण्यास तो आला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यांना अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, हे करीत आहेत. Navi Mumbai Police Latest Crime News

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे यांनी अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई शहर करण्याकरिता अंमली पदार्थ विक्री खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सत्र राबवित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0