Navi Mumbai Job Scam :?जिओच्या नावाने बनावट ईमेल आयडी वेबसाईट तयार करून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
Navi Mumbai Jio Job Scam News : रिलायन्स जिओकडून नोकरी मिळत असल्याचा ई-मेल जर तुम्हाला आला असेल, तर सावध व्हा. हा मेसेज बनावट असू शकतो. या बनावट मेसेजमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. कंपनीनेच अशा बनावट ई-मेल सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
नवी मुंबई :- रिलायन्स जिओकडून नोकरीचे रिक्र्युटमेन्ट मिळत असल्याचा मेसेज ई-मेल जर तुम्हाला आला असेल, तर सावध व्हा. हा ई-मेल बनावट असू शकतो. Navi Mumbai Jio Job Scam या बनावट ई-मेल मुळे तुमची फसवणूक होऊ शकते. कंपनीनेच अशा बनावट ई-मेल पासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.कंपनीचे नोकर असल्याचे भासवुन, फसवणुक झालेल्या लोकांकडुन लॅपटॉप, मोबाईल फोन, सिमकार्ड करिता असे एकुण तीन लाख रूची फसवणुक केली. तसेच रिलायन्स कंपनीची बदनामी केली म्हणुन रबाळे एम.आय.डी.सी, पोलीस ठाण्यात भादंवी कलम 420,500,34 सह माहीती तंत्रज्ञान अधि. कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर गुन्हा क्लिष्ट व आव्हानात्मक असल्याने सायबर पोलीस ठाणेकडुन समांतर तपास चालु करण्यात आलेला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी पोलीस उप निरीक्षक रोहित बंडगर यांचे सह पोलीस पथक तयार करून तपास सुरू करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरूध्द दाखल असताना सुध्दा पथकाने सखोल तांत्रिक तपास करून अज्ञात व्यक्तीने गुन्हा करताना वापरलेले ई मेल आय. डी तसेच मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे वास्तव्य बिहार राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली. स्थानिक पोलीसांच्या मदतीने सापळा रचुन आरोपी नामे विकास कुमार/अरविंदप्रसाद यादव, (वय 32, रा. नालंदा, बिहार) यास ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास 13 जानेवारी 2024 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे आणि भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस निरीक्षक विशाल पादीर, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे, पोलीस हवालदार विजय आयरे, विनोद हिरे,भाऊसाहेब फटांगरे, पोलीस शिपाई नरहरी क्षिरसागर, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे यांनी उघडकीस आणला आहे