मुंबई

Navi Mumbai Illegal Bar: नवी मुंबई म.न.पा. उपायुक्त डॉ.गेठे एमएच 43 या रेस्टॉरंट बारवर कारवाई का नाही?, कारवाई करिता मनपा उपायुक्त हातबल का?

Navi Mumbai Illegale Bar News : नवी मुंबई म.न.पा. उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच कारवाई केली जात आहे, निःपक्षपाती कारवाई केली जात नसल्याचा आरोप

नवी मुंबई (जितीन शेट्टी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व महानगरपालिकेला (BMC) दिलेल्या आदेशावरून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे (Dr Kailash Shinde) यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई परिसरातील बार, हॉटेल, पब, हुक्का पार्लर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai BMC) क्षेत्रातील ४१ अनधिकृत रेस्टॉरंट आणि बारवर कारवाई(take action against Illegal Bar And Hotel) केली होती. मात्र, तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत सेक्टर १९ ई ए.पी.एम.सी. मध्ये असलेल्या एमएच ४३ रेस्ट्रो बारवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमएच ४३ रेस्टॉरंट बारच्या संपूर्ण इमारतीचे बांधकाम अनधिकृत आहे, हे अनेकवेळा आरटीआयच्या माध्यमातून समोर आले होते. तक्रारीही करण्यात आल्या होत्या. एमएच ४३ रेस्ट्रो बारच्या मालकाने बीम आणि कॉलमची रचना पाडली आहे. मात्र अतिक्रमणाबाबत डॉ.राहुल गेठे यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. डॉ.राहुल गेठे यांनी ओळखलेल्या ठिकाणी कारवाई केली जात आहे, निष्पक्ष कारवाई केली जात नसल्याचा आरोप आता होत आहे. (Navi Mumbai BMC will take against Illegal Bar And hotel)

अनधिकृत बारवर कारवाई नाही? ठराविकच बारवर कारवाईचा आरोप?

एमएच ४३ रेस्ट्रो बारमध्येही अनधिकृत लिफ्ट बसवण्यात आली असून टेरेस पूर्णपणे खचाखच भरली असून मागील बाजूस फूटपाथवर अतिक्रमण करून त्याचा वापर स्वयंपाकघरासाठी केला जात आहे. एवढ्या तक्रारी करूनही कारवाई होत नाही. या अतिक्रमणावर उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांनी पांघरूण घातले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण तुर्भे विभाग अधिकारी भारत धांडे यांनाही माहिती देण्यात आली. विभाग अधिकारी तथा उपअतिक्रमण आयुक्त डॉ.राहुल गेठे यांनी केवळ दिरंगाई सुरू केली आहे. अखेर उपायुक्त डॉ.गेठे कशाची वाट पाहत आहेत? निःपक्षपाती कारवाई करत नसल्याचा काहींचा आरोप आहे. (Navi Mumbai BMC will take against Illegal Bar And hotel)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0