मुंबई

Navi Mumbai Happy Figure Spa Busted : उलवेतील ‘हॅपी फिगर स्पा’ वर पोलिसांचा छापा, मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

•गुन्हे शाखेच्या पथकाने 4 पीडित महिलांची केली सुटका; स्पा मालकिनीला अटक.

नवी मुंबई :- उलवे येथील ‘हॅपी फिगर स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 पीडित महिलांची सुटका केली असून, स्पा चालवणाऱ्या मालकिनीला अटक केली आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत ‘हॅपी फिगर स्पा’ (शॉप नंबर 3, प्लॉट नंबर 14, स्पाईस ॲव्हेन्यू सोसायटी, सेक्टर-8, उलवे) येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या स्पाची माहिती घेण्यात आली. बनावट ग्राहकाने इशारा दिल्यानंतर 8 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी दरम्यान पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी स्पाच्या आत 4 महिला आढळल्या. पोलिसांनी केलेल्या तपासणीत असे निष्पन्न झाले की, स्पाची मालकीण, जयश्री अस्लम पटेल उर्फ जयश्री विठोबा बुवाजी (वय 35), ही बॉडी मसाजच्या नावाखाली या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होती. ती प्रत्येक ग्राहकाकडून 4,000 रुपये घेऊन त्यातील काही रक्कम स्वतःकडे ठेवत होती.

या प्रकरणी आरोपी महिला जयश्री पटेल हिच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला 9 ऑगस्ट 2025 रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तिला 13 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उलवे पोलीस करत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago